मुंबई, 27 डिसेंबर : हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव होणं ही बाब खूप सामान्य आहे. त्यामुळंच लोक त्वचेला तजेलदार बनवण्यासाठी महागड्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. पण तरीही अनेकदा त्यांचे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. मात्र, काही घरगुती स्क्रब या महागड्या सौंदर्य उत्पादनांपेक्षाही सरस ठरू शकतात आणि चेहर्याला सौंदर्य देण्यात मोठी मदत करतात. जाणून घेऊया असे कोणते घरगुती आणि सोपे स्क्रब आहेत, जे तुमच्या शरीरावरील मृत त्वचा काढून टाकून त्वचेला सुंदर आणि तरूण बनविण्यात (Winter Skin Care Tips) मदत करू शकतात.
कॉफी स्क्रब वापरा
कॉफी स्क्रब (coffee scrub) त्वचेला तजेलदार बनवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. यासाठी एका भांड्यात एक मोठा चमचा कॉफी पावडर घ्या. नंतर त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट घेऊन चेहऱ्यावर हलक्या हातांनी पाच मिनिटे मसाज करून धुवा. हा स्क्रब त्वचेतील धूळ आणि मृत पेशी काढून टाकून निस्तेज बनलेल्या त्वचेला चमक देईल.
हे वाचा - Kitchen Tips: माशांच्या रेसिपीमुळे सर्वत्र वास येतोय? या ट्रिक्सने चुटकी सरशी दुर्गंधी घालवा
साखरेचा स्क्रब लावा
शुगर स्क्रब (sugar scrub) तुमची त्वचा तरूण आणि चमकदार बनवण्यातही मदत करेल. यासाठी एका भांड्यात एक मोठा चमचा साखर घ्या. त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल किंवा जोजोबा ऑईल मिसळा आणि त्वचेवर लावा. यानंतर चेहऱ्याला हलक्या हातांनी पाच मिनिटं मसाज करा. नंतर साध्या पाण्यानं धुवा, त्वचेत चमक येऊ लागेल. तुम्हाला हवं असल्यास ओठांना मुलायम आणि गुलाबी करण्यासाठी तुम्ही याचा वापर ओठांवरही करू शकता.
ओटमील स्क्रब वापरा
त्वचेचा कोरडेपणा आणि निस्तेजपणा दूर करून त्वचा मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी ओटमील स्क्रब वापरून पहा. यासाठी दोन चमचे ओटमील पाण्यात भिजवून काही वेळ ठेवा. यानंतर हे मिश्रण बारीक वाटून त्याची पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट त्वचेवर लावा आणि हलक्या हातांनी पाच मिनिटे मसाज करा. त्यानंतर धुवा. यानं तुमचा चेहरा उजळेल.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.