या दोन चुकांमुळे तुम्ही कधीही होणार नाही जाड, पहिली चूक तर गंभीर

अयोग्य आहार आणि कामाच्या वेळा सतत बदलल्यामुळे काहीजण लठ्ठ होत आहेत तर काहींचं वजन कमी होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 20, 2019 01:37 PM IST

या दोन चुकांमुळे तुम्ही कधीही होणार नाही जाड, पहिली चूक तर गंभीर

बदलत्या जीवनशैलीमुळे शरीराला आवश्यक ती पोषक तत्त्व मिळत नाहीत. यामुळे शरीर कमकूवत होतं आणि परिणाम वजन वाढत नाही. प्रत्येकालाच वाटतं की आपण सुदृढ आणि निरोगी असावं. मात्र अयोग्य आहार आणि कामाच्या वेळा सतत बदलल्यामुळे काहीजण लठ्ठ होत आहेत तर काहींचं वजन कमी होत आहे. कमकुवत आणि अशक्तपणामुळे अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं. आज आम्ही तुम्हाला दोन अशा चुकीच्या सवयींबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमचं वजन वाढत नाही. या दोन गंभीर चुका तुम्हाला जाड होण्यापासून रोखतात.

बारीक आणि लठ्ठपणाचं मोजमाप-

जर व्यक्तीचं बीएमआय मॉड्यूलस 18.5 पेक्षा कमी असेल तर तो कमी वजनाच्या गटात मोडला जातो. तसेच बीएमआय मॉड्यूलस 25 पेक्षा जास्त असेल तर ती व्यक्ती जाड गटात मोडली जाते. तसंच ज्या व्यक्ती बीएमआय मॉड्यूलसमद्ये 30 पेक्षा जास्त असतात त्यांना अती लठ्ठ प्रकारात मोडलं जातं.

नेहमी नैराश्यात राहणं-

कोणत्याही गोष्टीचा अती विचार करणं आणि सतत नैराश्यग्रस्त असणं हे शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे. नैराश्यात राहण्यामुळे भूक अजिबात लागत नाही. काही पौष्टिक खावं किंवा चमचमीत खावं असं अजिबात वाटत नाही. यामुळे शरीर कमकूवत होतं आणि अनेक आजारांच्या विळख्यात येतं.

Loading...

जिम जाऊन दररोज एकाचप्रकारचा व्यायाम करणं-

तंदुरूस्त होण्यासाठी अनेकजण नित्यनियमाने व्यायाम करतात. मात्र दररोज एकाचप्रकारचा व्यायाम करणं शरीरासाठी धोकादायक आहे. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती बायसेप्स मारत असेल किंवा दररोज वजन उचलत असेल तर हळू-हळू हातासोबतच शरीरही  कमकूवत होऊ लागतं.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बेडवर चुकूनही करू नका ही एक गोष्ट, आयुष्यभर रहाल अयशस्वी!

या इशाऱ्यांनी समजून जा मुलगा तुमच्याशी फ्लर्ट करतो की नाही!

फायदेशीर आहे हे गवत, मधुमेह- डोळ्यांच्या आजारावर ठरतं रामबाण उपाय

SPECIAL REPORT: ..तरीही मीच जिंकणार! पंकजा मुंडेंचं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 01:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...