Home /News /lifestyle /

सध्या चर्चेत असलेल्या Bra चा इतिहास माहिती आहे का? कुठे लागला शोध, कशी झाली उत्क्रांती?

सध्या चर्चेत असलेल्या Bra चा इतिहास माहिती आहे का? कुठे लागला शोध, कशी झाली उत्क्रांती?

अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिच्या ब्रा (Bra) संबंधित वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. वारंवार वादात येणाऱ्या ब्राचा इतिहास तुम्हाला माहित आहे का?

    मुंबई, 29 जानेवारी : अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) फॅशनशी संबंधित तिच्या एका वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी 26 जानेवारीला भोपाळला आली होती. यादरम्यान, मीडियासमोर ती म्हणाली, की सीरिजमध्ये 'देव' माझी ब्रा (Bra) साईज घेत आहे. या वक्तव्यानंतर अभिनेत्रीवर खूप टीका होत आहे. तिला माफीही मागावी लागली. ब्रा बाबत प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ब्रा बद्दल उघडपणे बोलणे देखील आपल्या देशात निषिद्ध आहे. जगभरातील कोट्यवधी लोकांच्या मनात ब्रा विषयी अनेक प्रश्न आहेत. आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे (History Of Bra Origin Evolution) जाणून घेऊया. चला तर मग चांगल्या कामाला उशीर नको. ब्रा म्हणजे काय? What is Bra ब्लाउजखाली स्त्रियांनी घातलेलं अंतर्वस्त्र म्हणजे ब्रा. ब्रा हे ब्रॅसीअरचे संक्षिप्त रुप आहे. स्तनांना आधार देण्यासाठी किंवा झाकण्यासाठी डिझाइन केलेले फॉर्म-फिटिंग अंडरगारमेंट. ब्रा घालण्याचा ट्रेंड कसा सुरू झाला? बीबीसी कल्चरमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, ब्रा हा फ्रेंच शब्द ब्रॅसीअरचं (Brassiere) एक संक्षिप्त रूप आहे, ज्याचा शाब्दिक अर्थ शरीराचा वरचा भाग असा होतो. पहिली आधुनिक ब्रा देखील फ्रान्समध्ये बनवली गेली. फ्रेंच लोकांनी 1869 मध्ये कॉर्सेट (जॅकेट सारखा ड्रेस) चे दोन तुकडे करून अंडरगारमेंट बनवले. नंतर त्याचा वरचा भाग ब्रा म्हणून परिधान करणे आणि विक्री सुरू झाली. पहिली ब्रा कुठे आणि कशी बनवली गेली, याचे निश्चित उत्तर देणे कठीण आहे. फ्रान्समध्ये आधुनिक ब्राची निर्मिती पहिल्यांदा आधुनिक ब्रा फ्रान्समध्ये तयार करण्यात आली. यात कापडाचे दोन तुकडे कापून त्यांना मध्यभागी जोडून ब्रा विकसित केली. त्यावेळी ब्रेसीअरला (Brassiere) तोडून ब्रा म्हणू लागले. पहिल्यांदा ही ब्रा कोणी बनवली आणि कशी बनवली हे सांगता येत नाही, पण पहिल्यांदा ब्राचा शोध फ्रान्समध्येच लागला होता, असं म्हटलं जातं. ब्रा बद्दल कोणताही इतिहास नाही. मात्र, जर आपण रोमन इतिहासकारांबद्दल बोललो तर प्रथम स्त्रिया आपले स्तन लपवण्यासाठी कापड बांधत असत आणि त्यानंतर ते कपडे कापून शिवले जात असत आणि नंतर हा ट्रेंड कदाचित फ्रान्समध्ये आला आणि Brassiere ला ब्रा म्हटले गेले. आधुनिक ब्राचा शोध 1889 मध्ये लागला. व्हिक्टोरियन काळात, स्त्रिया कॉर्सेट घालत असत, जे एक प्रकारचे जाकीट होते जे मागे दोरींनी घट्ट बांधले जा होते. हा इतका घट्ट असायचा की डॉक्टरांना सांगावं लागलं की यामुळे अस्वस्थता, पोट खराब होणे, दम लागणे अशा समस्या उद्भवू शकतात. लंडनमधील सायन्स म्युझियममधील पुश-अप ब्रा 19व्या शतकाच्या सुरुवातीला बनवण्यात आली होती. लाइफ मॅगझिननुसार, 30 मे 1889 रोजी फ्रान्सच्या हर्मिनी कॅडोलने आधुनिक ब्रा तयार केली. त्याने टू पीस अंडरगारमेंट बनवले होते. ज्याचे नाव कॉर्सलेट जॉर्ज होते. हिवाळ्यात Skin Care वर पैसे खर्च करण्यापूर्वी एकदा अशा पद्धतीनं गूळ वापरून पाहा यानंतर 1960 च्या दशकात स्त्रीवाद्यांचा झेंडा उंचावणाऱ्या महिलांनी ब्राच्या विरोधात आंदोलन सुरू केले. ब्रा, कृत्रिम पापण्या, केस कुरळे करण्यासाठी कर्लर्स हे पुरुषप्रधान समाजाचे प्रतीक आहेत आणि स्त्रियांच्या अत्याचाराचेही प्रतिक असल्याचा दावा त्यांनी केला. एवढेच नाही तर यामुळे महिला केवळ सेक्स ऑब्जेक्‍ट बनतात, असेही त्यांनी सांगितले. स्तन लपवण्यासाठी ग्रीसच्या इतिहासात ब्रा सारखे कपडे दाखवले आहेत. रोमन स्त्रिया छाती लपवण्यासाठी कापड बांधत असत. याउलट, ग्रीक स्त्रिया स्तनांना उभारण्यासाठी बेल्टचा वापर करत होते. आज आपण स्टोअरमध्ये पाहत असलेल्या ब्रा 1930 च्या आसपास अमेरिकेत बनवल्या जाऊ लागल्या. वास्तविक, आशियामध्ये ब्राचा इतका स्पष्ट इतिहास नाही. महिलांनी या सुपरफूडचा आहारात समावेश करायलाच हवा; लाँग टाइम राहाल Fit आणि Young ब्राच्या आगमनाचा विरोध प्रसिद्ध फॅशन मॅगझिन व्होगने 1907 च्या सुमारास ब्रॅसीअर हा शब्द लोकप्रिय करण्यात मोठी भूमिका बजावली. विशेष म्हणजे यासोबतच ब्रालाही विरोध झाला होता. हीच ती वेळ होती जेव्हा स्त्रीवादी संघटनांनी महिलांना ब्रा घालण्याच्या धोक्यांचा इशारा दिला आणि त्यांना सर्व सामाजिक आणि राजकीय बंधनांपासून मुक्त करणारे कपडे घालण्याचा सल्ला दिला होता. आधुनिक ब्राचा प्रारंभिक रुप 1911 मध्ये ऑक्सफर्ड शब्दकोशात ब्रा हा शब्द जोडण्यात आला. यानंतर, 1913 मध्ये, अमेरिकेतील सुप्रसिद्ध सोशलाईट मेरी फेल्प्सने सिल्क नॅपकिन्स आणि रिबन्सपासून स्वतःसाठी ब्रा बनवली आणि पुढच्या वर्षी तिचे पेटंट घेतले. मेरीने बनवलेली ब्रा आधुनिक ब्राचे प्रारंभिक रूप मानले जाऊ शकते. मात्र, त्यात अनेक त्रुटी होत्या. ते स्तनांना आधार देण्याऐवजी सपाट करत होते. हे फक्त एकाच आकारात उपलब्ध होते. महिलांकडून ब्राला केराची टोपली त्यानंतर 1921 मध्ये अमेरिकन डिझायनर आयडा रोसेन्थलने वेगवेगळ्या कप आकारांची कल्पना सुचली आणि सर्व प्रकारच्या शरीरासाठी ब्रा बनवल्या गेल्या. त्यानंतर ब्राच्या प्रमोशनचा काळ सुरू झाला, तो आजपर्यंत थांबलेला नाही. 1968 मध्ये सुमारे 400 महिला मिस अमेरिका सौंदर्य स्पर्धेचा निषेध करण्यासाठी एकत्र आल्या. त्यांनी इतर गोष्टींबरोबरच ब्रा, मेकअपचे सामान आणि उंच टाचांचे सामान कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले. ज्या डस्टबिनमध्ये या गोष्टी टाकल्या जात होत्या त्याला फ्रीडम ट्रॅश कॅन असे म्हणतात. या निषेधाचे कारण म्हणजे स्त्रियांवर सौंदर्याचे मानके लादणे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Health Tips, Women

    पुढील बातम्या