मुंबई, 14 फेब्रुवारी : जास्त वजन (Weigh Gain) आणि पुढे आलेलं पोट (Belly Fat) ही आपल्यापैकी बहुतेकांची समस्या आहे. पोटाचा घेर वाढायला अजिबात वेळ लागत नाही. मात्र, नंतर तो कमी करायला खूप मेहनत घ्यावी लागते. आरोग्य चांगलं राहण्यासाठी योग्य तो आहार घेणं (Diet) आणि व्यायाम करणं (Workout) अत्यावश्यक आहे. आपण जे खातो त्याचा परिणाम आपल्या शरीरावरून दिसतो असं म्हटलं जातं. त्यामुळेच आपल्याला योग्य आणि पौष्टिक आहाराची गरज असते. पण अनेकांना डाएट पाळणं अवघड वाटतं. खरोखरंच पौष्टिक आहार घेणं किंवा जंक फूड न खाणं किंवा तुमच्या शरीरावर विपरित परिणाम करणारे पदार्थ न खाणं हे इतकं सोपं आहे का? अजिबातच नाही. दररोज पौष्टिक आणि हेल्दी डाएट करणं काही प्रमाणात नक्कीच कठीण आहे. पण आम्ही तुम्हाला काही सुपरफूड्स सांगणार आहोत. यांचा आहारात समावेश केलात तर तुमच्या पोटाचा घेर कमी व्हायला नक्कीच मदत होईल.
ग्रीन टी (GREEN TEA)
खरं तर ग्रीन टीबद्दल (GREEN TEA) अनेक गैरसमज आहेत. पण ग्रीन टी एक अतिशय उत्तम आरोग्यदायी पेय आहे. यामध्ये अँटिऑक्सिंडंट्स (Antioxidents) आणि कॅफेन (Caffine) असतं. यामुळे चयापचय क्रिया (Metabolism) अधिक वेगाने होते आणि शरीरातील चरबी कमी होण्यासाठी याचा उपयोग होतो.
मूग डाळ (Moong Dal)
मूग डाळ (Moong Dal) हे एक अत्यंत पौष्टिक सुपरफूड (Healthy Superfood) आहे. यामध्ये A,B,C आणि E व्हिटॅमिन्स असतात. तुमच्या फॅटी म्हणजेच जास्त फॅट्स असलेल्या पदार्थांऐवजी मूग डाळीचं आहारातलं प्रमाण वाढवलंत तर त्यामुळे वजन अगदी सहजपणे आणि भरपूर कमी होतं
ओवा (AJWAIN SEEDS)
एरव्ही ओव्याकडे (Ajwain Seeds) तसं दुर्लक्षच केलं जातं. पण आहारात ओव्याचा समावेश केला तर त्याचे खूप फायदे आहेत. ओव्यामध्ये भरपूर फायबर (Fiber) असतं, अँटीऑक्सिडंट्स (Antioxidents) आणि अन्य पोषक घटक असतात.
वाढत्या वयासोबत नाश्त्यात घ्यायला हवेत हे हेल्दी फूड्स, नेहमी राहाल Powerful
हळद (Turmeric)
हळदीमध्ये औषधी अँटिऑक्सिडंट्स (Antioxidents) असतात. त्यामुळे यकृतातील टॉक्सिन्स (Toxins in Liver) कमी होऊन ते अधिक निरोगी होतं.
कोको (Cocoa)
कोकोमुळे (Cocoa) मेंदूतील सेरॉटॉनिन (Serotonin) वाढतं आणि त्यामुळे तुमचा मूड चांगला होतो. तुम्हाला जर पोट कमी करायचं असेल तर डाएटचा भाग म्हणून तुम्ही कधीतरी एकदा डार्क चॉकलेट (Dark Chocolate) खाऊ शकता.
डाळींचा आहारात समावेश करणाऱ्यांनी ही एक गोष्ट समजून घ्या, दुप्पट मिळतील फायदे
ॲव्हकॅडो (AVOCADO)
ॲव्हकॅडोमध्ये (Avocado) मध्ये हेल्दी फॅट्स, (Healthy Fats) व्हिटॅमिन C,E आणि B6 असतात. त्यामुळे हे खाल्यावर तुम्हाला पोट पूर्ण भरल्यासारखं वाटतं आणि तुमची भूकही कमी होते. त्यामुळे जास्तीचं खाणंही आपोआपोच टाळलं जातं.
अर्थात तुम्हाला या सुपरफूड्सची ॲलर्जी नाही ना हे एकदा तपासून बघणं गरजेचं आहे. एखाद्या डाएटिशियनशी संपर्क साधा. वजन कमी करण्यासाठी ते तुम्हाला योग्य डाएट चार्ट तयार करून देतील. त्याचप्रमाणे नुसतं डाएट करुन उपयोगाचं नाही. वजन कमी करण्यासाठी आणि पोटाचा घेर कमी करण्यासाठी तुम्हाला दररोज न चुकता व्यायाम करणं गरजेचं आहे. तरंच तुम्हाला डाएटचेही योग्य ते परिणाम दिसतील. पण हेल्दी खा हेल्दी राहा हे मात्र लक्षात ठेवा आणि या सुपरफूड्सचा समावेश आहारात करायला लगेचच सुरुवात करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weight loss, Weight loss tips