मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Parenting mistakes : मुलाचे संगोपन करताना तुम्हीही करत नाही ना या 5 चुका? अशी घ्या काळजी

Parenting mistakes : मुलाचे संगोपन करताना तुम्हीही करत नाही ना या 5 चुका? अशी घ्या काळजी

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

पालकांच्या (Parenting Mistakes) काही सवयी मुलांचं आयुष्य कायमचं खराब करू शकतात. तर, दुसऱ्या बाजूला, मानसिकदृष्ट्या बळकट असलेली मुलं त्यांच्या स्वतःच्या समस्या सोडवू शकतात आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर :  आई-वडील अनेकदा त्यांचा ताण-तणाव किंवा राग मुलांवर काढतात. पालकांच्या रागाचा मुलांवर मोठा आणि खोल परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, पालकांच्या (Parenting Mistakes) काही सवयी मुलांचं आयुष्य कायमचं खराब करू शकतात. तर, दुसऱ्या बाजूला, मानसिकदृष्ट्या बळकट असलेली मुलं त्यांच्या स्वतःच्या समस्या सोडवू शकतात आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात. तज्ज्ञांच्या मते, पालकांनी मुलांना वाढवताना या काही चुका अजिबात करू नयेत.

मुलांच्या भावना दडपणं

मुलांच्या भावना कधीही दडपल्या जाऊ नयेत. मूल जशा कुठल्या पद्धतीनं बोलत असेल, त्या-त्या पद्धतीनं ते स्वतःला व्यक्त करत असतं. त्याला स्वतःला व्यक्त करण्याची संधी आणि मोकळीक द्या. थेरपिस्टच्या मते, जेव्हा पालक मुलांना सांगतात की, 'या गोष्टीवर जास्त रडू नको किंवा ही फार मोठी गोष्ट नाही', तेव्हा ते एक प्रकारे संदेश देतात की, भावना फारशा महत्त्वाच्या नाहीत आणि त्यांना दडपलं पाहिजे. त्याऐवजी, त्या क्षणी मुलाला काय अपेक्षित आहे, ते विचारा. जेणेकरून, त्यांना बरं वाटेल. यामुळं त्यांना स्वतःच्या भावना समजून घेण्यास आणि पुढील वेळेस त्या स्वतःच्या स्वतः हाताळण्यास मदत होईल.

मुलांना नेहमी अपयशापासून वाचवणं -

पालकांसाठी आपल्या मुलांना आव्हानांचा किंवा वाईट परिस्थितींचा सामना करताना पाहणं हे एक कठीण काम असतं. पालक आपल्या मुलांना अपयशापासून वाचण्यासाठी अनेकदा मदत करतात, जे चुकीचं आहे. उदाहरणार्थ, जर मूल अभ्यासात चांगली कामगिरी करत नसेल आणि तुम्ही त्याचा सर्व गृहपाठ तयार करून दिलात तर, त्याला त्याच्या उणिवांची जाणीव कधीच होणार नाही. जेव्हा मुलाला शाळेत स्वतः परीक्षा द्यावी लागते, तेव्हा तुम्ही तिथे जाऊन त्याला मदत करू शकत नाही. अपयश हादेखील यशाचा एक भाग आहे ही बाब मुलाला समजू द्या. अपयशानंतरही यश मिळवता येते अशी भावना मुलामध्ये विकसित करा

हे वाचा - केंद्र सरकारचा मोठा निर्णय : या महिलांना 24 आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी मिळाली

मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करणं -

मुलं सहसा पालकांकडून काही ना काही मागणी करत राहतात आणि प्रत्येक मागणी पूर्ण करणं हे पालक आपलं कर्तव्य मानतात. तथापि, संशोधन दर्शवितं की मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं चूक आहे. असं केल्यानं मुलांना मनमानी करण्याची सवय लागू शकते. तसंच त्यांच्या मानसिक क्षमतेवर परिणाम होतो आणि ते स्वयं-शिस्त शिकण्यास सक्षम राहात नाहीत. मुलांना वाटतं की त्यांना हवं ते मिळेल आणि मिळालंच पाहिजे. छोटे-छोटे नियम तयार करून त्याद्वारे मुलांना शिस्तीची सवय लावा. जसं की, टीव्ही पाहण्यापूर्वी गृहपाठ पूर्ण करणं, कुठेही जाण्यापूर्वी आपलं सर्व साहित्य स्वतः पॅकिंग करणं.

पूर्णतेची अपेक्षा करणं -

प्रत्येक पालकाची इच्छा असते की, त्यांचं मूल प्रत्येक बाबतीत परिपूर्ण असावं. तज्ज्ञांच्या मते, पालकांच्या या सवयींमुळं मुलांमध्ये स्वाभिमान/आत्मसन्मान आणि आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो. मुलांना परिपूर्णतेची व्याख्या समजावून सांगा आणि जर तो त्या प्रमाणात यशस्वी होऊ शकत नसेल तर, त्याला कुठं कमी पडतंय ते समजावून सांगा आणि पुढच्या वेळी त्यानं त्यानुसार कामगिरी करावी असं समजावून सांगा.

हे वाचा - Explainer: लहान मुलांसाठी Covaxin ची शिफारस; लस किती सुरक्षित? बालकांना द्यावी का? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

मुलांना नेहमी आरामदायक आणि सहज वाटेल असं वातावरण देण्याचा प्रयत्न करू नये

नवीन काम करणं, नवीन काहीतरी खाणं, नवीन मित्र बनवणं, नवीन खेळ खेळणं किंवा नवीन शाळेत जाणं यासारख्या अनेक गोष्टी मुलांना अस्वस्थ करणाऱ्या वाटू शकतात. आपण नेहमीच मुलांची संरक्षक ढाल असण्याची गरज नाही. यामुळं त्यांची मानसिक क्षमता कमजोर होते. मुलांना स्वतःहून नवीन वस्तू वापरण्याची परवानगी द्या. नवी परिस्थिती आपली आपण हाताळण्याची सवय त्यांना लावा. त्यांना सुरुवातीला त्या गोष्टींमध्ये अडचण येऊ शकते. परंतु, हळूहळू त्यांना त्या गोष्टी आरामात जमू लागतील.

First published:

Tags: Lifestyle, Personal life