इंग्लंड, 19 ऑक्टोबर : महिलांना कायम अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. अनेकदा अनोळखी व्यक्ती त्यांना इनबॉक्समध्ये अश्लील फोटो किंवा संदेश पाठवतात. याबाबत पोलिसात तक्रार केल्यानंतरही नेहमीच आरोपी सापडतो असं होत नाही. बऱ्याचदा तर मुली आपला नंबर वा ईमेल आयडी बदलतात. ब्रिटेनच्या नॉर्थ यॉर्कशायरमध्ये एका महिलेने तिला न्यूड फोटो पाठविणाऱ्या व्यक्तीला असं उत्तर दिलं आहे की, तो पुरता घाबरला आहे. तिच्या या उत्तराचं सर्वांकडून खूप कौतुक केलं जात आहे.
नॉर्थ यॉर्कशायरची एलेक्जेंड्रा कुरी हिने ट्विटरवर या घटनेबाबत खुलासा केला आहे. कशाप्रकारे हाफ न्यूड फोटो मिळाल्यानंतर तिने दिलेल्या उत्तरामुळे परिस्थितीत बदलली आणि फोटो पाठविणाऱ्याची धांदल उडाली. तिने उत्तर देत असताना स्वत:ला रोबोटच्या रुपात दाखविले आणि लिहिलं की, AUTOREPLY: आम्ही पोर्नोग्राफिक फोटोंचं संप्रेषण डिटेक्ट केलं आहे. जो अवैध असू शकतो. [code:36489-a] आणि तुमच्या डिव्हाइसच्या आयपी एड्रेसचा तपास करण्यासाठी पोलीस डिपार्टमेंटला पाठविण्यात येत आहे.
हे ही वाचा-सेक्सदरम्यान पोजिशन बदलताना घडला धक्कादायक प्रकार; महिलेला आलं अपंगत्व
एलेक्जेंड्राने पुढे लिहिलं की, जर तुम्हाला वाटतं की चूक झाली आहे तर STOP असा रिप्लाय करा. तो समोरील व्यक्ती पोलिसांच्या भीतीने पुरता घाबरला. त्याने एकदा नाही तर दोन वेळा STOP असं लिहिलं. एलेक्जेंड्राच्या या उत्तराला लोक खूप पसंत करीत आहेत. आणि पुढेही असंच कर..असा सल्लाही देत आहे. अनेक मुलींनाही हा पर्याय चांगला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांच्या भाषेतील संदेश कॉपी करुन ठेवू व असा प्रकार घडला तर त्याचा पाठवू अशाही प्रतिक्रिया तिला येत आहेत.