अथांग सागरातील पाण्या खालचे जग (Sea World) अदभूत रम्य आहे. आजही या सागरी विश्वातील अनेक कोडी मानवाला उलगडलेली नाही. या दुनियेतील अनेक रहस्यं मानवाला साद घालत असतात. असंख्य प्रकारचे जीव, वनस्पती यांनी सजलेली ही समुद्री दुनिया मानवाला अनेकदा आपल्या अदभूततेची साक्ष घडवणारे अनुभव देते. अनेक अनाकलनीय रहस्यांचा खजिना आपल्या उदरात लपवणाऱ्या सागरातून अनेक अनमोल गोष्टी मानवाला मिळत असतात. अशीच एक आश्चर्यचकीत करणारी गोष्ट नुकतीच सापडली आहे. ही निर्जीव वस्तू नाही तर हा आहे एक मासा. असा तसा नव्हे तर हा तब्बल 42 कोटी वर्षे जुना मासा (42 Crore Years Old Fish) असून, विशेष म्हणजे हा मासा जिवंत आहे.
मोगांबे न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, मादागास्करच्या(Madagascar Sea) समुद्रात मच्छिमारांना जगातील सर्वांत जुना मासा मिळाला आहे. हा मासा 42 कोटी वर्षांचा असूनही तो जिवंत आहे. दरम्यान, शास्त्रज्ञांनी हा मासा आपल्या ताब्यात घेऊन त्याचा अभ्यास सुरू केला आहे. माशाच्या या प्रजातीला कोएलकांथ (Coelacanth) म्हणतात. या माशाला चार पाय असतात. याचार पायांमुळे हा मासा शास्त्रज्ञांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. पण ही प्रजाती (Brid) नामशेष झाल्याचं मानलं जात होतं. आता अनेक वर्षानी हा मासा शार्कच्या शिकाऱ्यांनी समुद्राच्या खोल पाण्यातून बाहेर काढला आहे. डायनासोरबरोबरच (Diana sour) ही प्रजातीदेखील संपली असावी असा समज होता; पण आता अनेक वर्षांनंतरहा मासा सापडल्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे.
हे ही वाचा-रोजच्या आहारात काळ्या मीठाचा वापर ठरेल अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या फायदे
पाय असणारा मासा :
माशाची ही प्रजाती 42 कोटीवर्ष जुनी असल्याचं म्हटलं जातं. समुद्रात 300 ते 500 फूट खोलीवर हे मासे आढळतात. या माशांना पाय असतात हे यांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे. इतक्या जुन्या प्रजातीचा हा मासा इतक्या वर्षांनी सापडल्यानं शास्त्रज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत. इतक्या वर्षांनंतर हा मासा जिवंत कसा सापडला? याचं सर्वांनाच आश्चर्य वाटत असून, या माशामुळे इतर समुद्री जीवांना काही त्रास होणार नाहीनां अशी शंका शास्त्रज्ञांना वाटत आहे.
अनेक वर्षे सुरू आहे संशोधन:
या जातीच्या माशांवर वर्षानुवर्षेअनेकशास्त्रज्ञ संशोधन(Research)करत होते. मात्र ही प्रजाती नामशेष झाल्याचा त्यांचा समज होता.आताया प्रजातीतील जिवंत मासा सापडल्यानं पुन्हा एकदा यावरील संशोधनाला चालना मिळणार आहे. मादागास्करमध्ये ज्या ज्या ठिकाणी हा मासा सापडतो असं समजलं जात होतं. तिथं तो कधीतरी पुन्हा सापडेल अशी आशा होती, त्याप्रमाणे तो सापडला आहे. अर्थातच खूपच वर्षांनी पण यामुळे आता प्रजातीच्या संशोधनाला वेगळे वळण लागण्याची अपेक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fish