मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हातात बॅग धरण्याची पद्धत दर्शवते तुमचं व्यक्तिमत्त्व; पाहा तुमचं काय आहे?

हातात बॅग धरण्याची पद्धत दर्शवते तुमचं व्यक्तिमत्त्व; पाहा तुमचं काय आहे?

हॅंड बॅग

हॅंड बॅग

पर्सनॅलिटी अर्थात एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व. अनेकदा पहिल्या भेटीत दिसणाऱ्या व्यक्तिमत्त्वावरून व्यक्तीचं मूल्यमापन होतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : पर्सनॅलिटी अर्थात एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व. अनेकदा पहिल्या भेटीत दिसणाऱ्या व्यक्तिमत्त्वावरून व्यक्तीचं मूल्यमापन होतं. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही संकल्पना गेल्या काही दशकांत अधिक दृढ झाल्याचं दिसून येतं. कुठल्याही समारंभात किंवा सोहळ्याला गेल्यावर पेहराव, वागणं, बोलणं, विचारांची दिशा यावरून बाकीच्या व्यक्ती एकमेकांबद्दल मतं बनवतात. यामुळे सार्वजनिक ठिकाणी काही मॅनर्स पाळावेच लागतात. व्यक्तीच्या यशापयशात व्यक्तिमत्त्वाचाही महत्त्वाचा वाटा असतो. व्यक्तिमत्त्व ओळखण्याबद्दल काही संकेत आहेत. एखादी व्यक्ती हातातली बॅग कशी धरते किंवा हातात कशी पकडते या गोष्टीही संबंधित व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल थोडी ओळख करून देतात. हातात बॅग धरण्याची पद्धत आणि व्यक्तिमत्त्व यांचा परस्पर संबंध कसा असतो, हे जाणून घेऊ. याबद्दल माहिती देणारं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे.

बॅग विकत घेताना ती फॅशनेबल, आकर्षक असावी यासाठी आपण अनेक दुकानं फिरतो. बॉडी लँग्वेज एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, बॅग विकत घेण्याच्या निवडीवरून आणि ती हाताळण्याच्या पद्धतीवरून संबंधित व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलच्या अनेक गोष्टींचा उलगडा होतो.

हेही वाचा -  वय कमी करण्यासाठी 'हा' उद्योगपती करतोय लाखो रुपये खर्च; आतापर्यंत 5 वर्ष वय कमी केल्याचा दावा

क्रॉस बॉडी बॅग

काही जणांना आपली बॅग पाठीवर न घेता, कमरेच्या उजव्या किंवा डाव्या बाजूस ठेवणं म्हणजेच पट्टा खांद्यावरून क्रॉस पद्धतीने घेण्याची सवय असते. अशा व्यक्ती स्वत:च्या सुरक्षेच्या बाबतीत जागरूक असतात. तसंच बॅग जवळ बाळगताना त्याचा वापर अधिकाधिक सुलभ व्हावा याकडे त्यांचं लक्ष असतं. अशा क्रॉस पद्धतीने बॅग अडकवल्यावर तीवर सतत लक्ष ठेवण्याची गरज लागत नाही. उलट, गर्दीच्या ठिकणी बॅगेचा वापर करणं अधिक सोपं होतं.

टोटे बॅग

काही जण बॅग खांद्यावर टांगलेल्या स्थितीत ठेवणं पसंत करतात. या स्थितीत बॅग शरीर आणि हाताच्या मधोमध राहते. अशा व्यक्ती या शांत आणि संयमी वृत्तीच्या असतात. या व्यक्तींना नियोजनबद्ध काम करायला आवडतं. तसंच कुठल्याही गोष्टीसाठी पुढाकार घेणं आणि आत्मविश्वासाच्या जोरावर काम तडीस नेणं, यात या व्यक्ती हुशार असतात.

बॅकपॅक

बॅकपॅक म्हणजे पाठीवर बॅग घेऊन जाणाऱ्या व्यक्ती स्वतंत्र विचारांच्या असतात. आपल्या सोबतच्या व्यक्तींची काळजी घेणं त्यांना चांगल्याप्रकारे जमतं. तज्ज्ञांच्या मते, कम्फर्ट आणि स्टाइल यांचा ते उत्तम मेळ साधतात. अशी माणसं तब्येतीची उत्तम काळजी घेतात. अशा व्यक्तींचे विचारही सुस्पष्ट आणि तर्कसुसंगत असतात. यामुळे अशा व्यक्तींना पाठीवर बॅग घेऊन जाणं श्रेयस्कर वाटतं.

हेही वाचा  -  Diabetes And Shoe : डायबेटिज रुग्णांनी घालावेत असे शूझ; कंट्रोलमध्ये राहिल ब्लड शुगर

ब्रीफकेस

काही जणांना ब्रीफकेस वापरणं अधिक सोपं वाटतं. काहींच्या मते, ब्रीफकेस केवळ पुरुषांसाठीच असते. परंतु, तसं अजिबातच नाही. ब्रीफकेस वापरणाऱ्या व्यक्ती आधुनिक आणि स्वतंत्र विचारांच्या असतात. तसंच या व्यक्तींचे विचार सुस्पष्ट असतात. त्यांना दृढ आत्मविश्वास असतो.

वॉलेट

अनेक जणांना बॅग वापरण्यापेक्षा केवळ वॉलेट वापरणं आवडतं. अशी माणसं अतिशय सकारात्मक विचारांची आणि उत्साही असतात. आपण कुठे तरी चुकू अशा नकारात्मक विचारांना यांच्या मनात स्थान नसतं. परिणामी, अशा व्यक्तीच्या भोवतालचं वातावरण आनंदी असतं. परंतु, कुठलं संकट किंवा अडचण समोर आली तर त्याचा सामना करणं अशा व्यक्तींना अवघड होतं.

कोपरात बॅग अडकवणं

काही जण खांद्यावर किंवा पाठीवर बॅग न घेता हात आणि हाताचं कोपर याच्या मध्यभागी बॅग अडकवतात. बॉडी लॅंग्वेज एक्स्पर्ट्सच्या मते, अशी माणसं स्वत:ला कायम सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशांसाठी आपली समाजातली पत फार महत्त्वाची असते. तसंच या माणसांना सतत इतरांकांच्या नजरेसमोर राहायला आवडतं.

First published:

Tags: Lifestyle