Home /News /lifestyle /

तुम्ही जेवता कसे? आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी खाताना या गोष्टींना लांब ठेवाच

तुम्ही जेवता कसे? आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी खाताना या गोष्टींना लांब ठेवाच

चांगल्या आरोग्यासाठी काय खावे, काय खाऊ नये याबाबत अनेकजण सजग झाले आहेत. आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला जेवण कसे खावे हे देखील माहीत असणे गरजेचे आहे.

    नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले राखणे ही देखील एक महत्त्वाची (Way of eating food affects Gut health) गोष्ट बनली आहे. चांगल्या आरोग्यासाठी काय खावे, काय खाऊ नये याबाबत अनेकजण सजग झाले आहेत. आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला जेवण कसे खावे हे देखील माहीत असणे गरजेचे आहे. यूके न्यूज वेबसाइट मेट्रोवरील एका लेखात, पोषण तज्ज्ञ क्लेरिसा लेनहर असे म्हणतात, लोकांना असे वाटते की आतड्यांचे आरोग्य केवळ आपण खाल्लेल्या पदार्थांशी संबंधित आहे. परंतु, आपल्याला हे माहीत असले पाहिजे की, आपण खाण्याची पद्धत देखील त्यासाठी खूप महत्वाची आहे. क्लेरिसा लेनहार पुढे म्हणतात, 'अनेकांना चालता-चालता अन्न खाण्याची सवय लागली आहे, पण अशा सवयींमुळे अपचन आणि आतड्यांना सूज येणे, अशी लक्षणे दिसू शकतात. जेव्हा पचनाशी संबंधित समस्या येतात तेव्हा विचार न करता खाणे हे सर्वात मोठे घातक बनते. त्या म्हणतात, 'आपण जेवताना अनेक वेळा पाचन प्रक्रियेसाठीचे महत्त्वाचे भाग वगळतो, पण जेव्हा आपली पचनसंस्था प्रभावीपणे काम करत असते, तेव्हा आपण आपले अन्न सहज पचवू शकतो आणि खाण्यातून अधिक पोषक तत्त्वे घेऊ शकतो आणि आतड्यांचे चांगले आरोग्य मिळवू शकतो.' आपण खाण्याच्या पद्धतीमध्ये थोडे बदल करून आतड्यांची कार्यक्षमता कशी सुधारता येईल याबाबत माहिती घेऊया. अन्न चांगले चर्वण करा क्लेरिसा म्हणतात की, पचन यंत्रणा आपल्या तोंडातून सुरू होते. जेव्हा आपण अन्न पदार्थ व्यवस्थित चघळता, तेव्हा आपण लाळ सोडतो, ज्यात पाचक एंजाइम असतात, जे खाल्लेले अन्न पचवण्यास मदत करतात. ही प्रक्रिया नीट न झाल्यास आतड्याला सूज येणे आणि अपचन होऊ शकते. अन्न तोंडात पूर्ण बारीक होईपर्यंत ते चावले पाहिजे, तोंडातील घास सफरचंद पुरीसारखा बनला पाहिजे. हे वाचा - Shocking: कॉफी न आवडल्यानं भडकला पोलीस; महिला वेट्रेससोबत जे केलं ते वाचून बसेल धक्का चालता-चालता खाणे टाळा चालता-चालता खाल्ल्याने जास्त खाणे, अपचन आणि पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो. जेव्हा आपण हालचाल करत असतो, तेव्हा आपले शरीर एका वेगळ्या sympathetic state अवस्थेत असते. त्यावेळी खाणे योग्य नसते. म्हणून, जेव्हा आपण आपल्या पॅरासिम्पेथेटिक (parasympathetic state) अवस्थेत असतो तेव्हा आपण खाल्ले पाहिजे. विश्रांती घेऊन आरामात खाल्ले पाहिजे. नियमित जेवणाची वेळ जर आपण आपला नियमित आहार योग्य वेळी घेतला तर आपण स्नॅक्स आणि फालतू गोष्टी खाणे टाळतो. स्नॅकिंग माइग्रेटिंग मोटर कॉम्प्लेक्स (MMC) ला प्रोत्साहन देते. जे आतडे स्वच्छ करण्यात आणि आपल्या आतड्यांच्या हालचाली नियमित ठेवण्यास मदत करते. नियमित जेवण्याची सवय ठेवा, प्रत्येक जेवणामध्ये तीन ते चार तासांचे अंतर ठेवण्याचे ध्येय ठेवा. तणावाखाली खाणे टाळा जर तुम्हाला जेवणाच्या वेळी तणाव वाटत असेल तर खाण्यापूर्वी काही खोल श्वास घ्या. खोल श्वासोच्छ्वासामुळे व्हॅगस नर्व शांत होऊ शकतो, जे आतडे आणि मेंदू यांच्यातील अनेक सिग्नल नियंत्रित करते. हे वाचा - Covaxin approved for Children : 2-18 वयोगटासाठी Covaxin लशीला मान्यता, लवकरच सुरू होणार लसीकरण खाताना जेवणाकडेच लक्ष द्या जेव्हा आपण जेवायला सुरू करतो, तेव्हा आपला मेंदू त्याची नोंद घेतो आणि पचन प्रक्रियेला गती देतो. म्हणून जेव्हा आपण खाताना खाण्यापेक्षा इतर गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करतो, तेव्हा त्याचा मेंदूच्या स्थितीवर परिणाम होतो. यामुळे आतड्यांमध्ये जळजळ होण्यासारखे अनेक नुकसान होऊ शकते. म्हणून जेवताना टीव्ही बंद ठेवा, तुमचा फोन दूर ठेवा आणि तुमच्या ताटात आलेले अन्न आनंदाने खा, त्याचा आदर करा. हळूहळू खा आता पोट भरले आहे, याचा मेंदूला सिग्नल पाठवण्यासाठी 10-20 मिनिटे लागू शकतात. जर आपण हळू हळू खात असाल तर आपण हे सिग्नल गमावू शकतो आणि जास्त खाणे टाळू शकतो. तुम्ही कुठेही जेवण खाण्यासाठी 10-20 मिनिटांचा वेळ आदर्श मानला जातो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या