नवी दिल्ली, 25 डिसेंबर : थंडीने आता आपले खरे रंग (Winter) दाखवायला सुरुवात केली आहे. अनेक शहरांमध्ये तापमान उणेपर्यंत पोहोचले असून नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. हिवाळ्यात थंडी टाळण्यासोबतच लोकांना आहाराचीही विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीच्या मोसमात विशेष आहार घ्यावा आणि त्यात खजुराचा अवश्य समावेश असावा, असे आहार तज्ज्ञ सांगतात. हिवाळ्यात खजूर (dates) खाणे आरोग्यासाठी अनेकदृष्या फायदेशीर (Winter Health Tips) असते.
हिवाळ्यात खजूर खाण्याचा सल्ला का दिला जातो आणि खजूर खाण्याचे काय फायदे आहेत. त्यामध्ये कोणते महत्त्वाचे घटक असतात याविषयी आज आपण जाणून घेणार (super food on cold days is dates) आहोत.
हृदयविकाराचा धोका
हिवाळ्यात शरीराचे तापमान कमी राहिल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढते, हे अनेकांना माहिती आहे. खजूर खाल्ल्याने तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते आणि हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. याशिवाय, खजूर नेहमी आहारात घेतल्याने स्टॅमिना वाढतो आणि तुम्ही हिवाळ्यात अधिक सक्रिय राहता.
हे वाचा - चुकीचा रिटर्न भरल्यास नोटीस ऐवजी आता थेट होणार वसुली, वाचा का होणार कारवाई
थंडीत हिट राहते
हिवाळ्यात खजूर खाल्ल्याने शरीरातील उष्णता योग्य राहते. त्यामुळे थंडीचा त्रास कमी जाणवतो. विशेष म्हणजे खजूर तुम्ही अनेक प्रकारे वापरू शकता, अगदी ड्रिंक्सच्या स्वरूपातही खाऊ शकता. त्यामुळे हिवाळ्यात खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो.
पॉवर बूस्टर
तुम्हाला हिवाळ्यात झटपट उर्जेची गरज असेल तर तुम्ही खजूर खाऊ शकता. याचा उपयोग अनेक लोक प्री-वर्कआउट स्नॅक म्हणून करतात आणि जर तुम्ही जास्त वेळ काम करत असाल तर खजूर ऊर्जा टिकवून ठेवण्यासही उपयोगी आहे.
हे वाचा - ‘फक्त मनमोकळेपणाने बोला आणि ऐका’; म्हातारपणातही बुद्धी तल्लग ठेवण्याचा सोपा मंत्र
पचनसंस्था
हिवाळ्यात चयापचय कमी राहते, त्यामुळे फायबर मुबलक प्रमाणात आढळणारे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी खजूर हा उत्तम आहार असल्याचे सिद्ध झाले आहे, यामुळे अन्नाचे पचनही सहज होते. याशिवाय कॅन्सरचा धोकाही कमी होतो.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Lifestyle, Superfood, Winter, Winter session