शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या 'रॉक'ने लोखंडी गेटच उखडून काढला; पाहा VIDEO

शूटिंगला जाताना गेट उघडेना; वैतागलेल्या 'रॉक'ने लोखंडी गेटच उखडून काढला; पाहा VIDEO

रिल लाइफच नाही तर रिअल लाइफमध्येही आपण सुपरहिरो आहोत हे द रॉक (the rock) म्हणजेच ड्वेन जॉन्सनने (dwayne johnson) दाखवून दिलं.

  • Share this:

वॉशिंग्टन, 28 सप्टेंबर : हिरोने फक्त हातांनीच एका फटक्यात भिंत तोडली, दरवाजा तोडला, गेट तोडला आणि तो हातात धरून फेकला. असं आपण कित्येक फिल्ममध्ये पाहत आलो आहोत. मात्र रिल लाइफमधील हा सीन रिअल लाइफमध्ये करून दाखवला तो हॉलिवूड आणि WWE मधील सुपरस्टार ड्वेन जॉन्सनने (dwayne johnson). शूटिंगला जायला निघाल्यावर त्याच्या घरासमोरील गेट उघडत नव्हता म्हणून रॉकने हातांनीच गेट तोडला आहे.

सध्या हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला जॉन्सन WWE मधील एक सुपरस्टार रेसलर होता. आता त्याने रेसलिंग सोडली आहे, मात्र त्याचा जोष आणि ताकद अद्यापही कायम आहे, हे त्याने दाखवून दिलं आहे.

View this post on Instagram

Well here’s the destruction ‍♂️ I left behind after pulling my gates off myself and going to work. This footage was taken from my security after I had already left and he arrived on the scene. The second video is of our technicians and welders carrying one of the gates and placing it gently in the grass. As you guys know from my last post, there was a power outage at my house, causing my gates to not open. Sure as hell wasn’t my best hour, but there were a lot of people waiting for me at work so I did what I had to do, hopped in my pick up and went to work. Maybe next time I’ll just hop the gates and call an Uber. Actually, no I won’t. There’s no fun in that Jokes aside, THANK YOU to the techs and welders who mobilized very quickly in the morning to come over and take care of the destruction. Thank you, gentlemen. Just one of those days where I wasn’t in the mood. We’ve all been there. #ripgates

A post shared by therock (@therock) on

ड्वेन जॉन्सन सध्या ‘ब्लॅक अॅडम’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात  तो एका सुपरहिरोची भूमिका साकारत आहे. रिल लाइफमध्ये तो सुपरहिरो साकारतोच आहे. मात्र रिअललाइफमध्येदेखील आपण सुपरहिरोपेक्षा कमी नाही हे त्याने दाखवून दिलं आहे.

हे वाचा - 'लाल सिंग चढ्ढा'त असाही दिसणार आमिर खान; VIRAL VIDEO तील लूक पाहून व्हाल हैराण

त्याने आपल्या घराबाहेरील लोखंडी गेट हातांनीच तोडला.  त्याच्या घराबाहेरील गेट रिमोर्टवर चालतो. मात्र तांत्रिक बिघाडामुळे हा गेट उघडत नव्हता. त्यानंतर रॉकला संताप अनावर झाला. तो सरळ गेटजवळ गेला. हातांनीच गेट तोडून टाकला. त्याने स्वत:च आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हे वाचा - आयशा झुल्काच्या कुत्र्याची हत्याच; अभिनेत्रीच्या बंगल्याचा केअरटेकर गजाआड

रॉकने शेअर केलेल्या व्हिडीओत रस्त्यावर पडलेला भलामोठा लोखंडी गेट दिसून येतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Published by: Priya Lad
First published: September 28, 2020, 8:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading