मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Men's Health: 30 वर्षांनंतर पुरुषांमध्ये या आजारांचा धोका वाढतो, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Men's Health: 30 वर्षांनंतर पुरुषांमध्ये या आजारांचा धोका वाढतो, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या खराब सवयींमुळे वयाच्या 30 व्या वर्षानंतर पुरुषांमध्ये (Men's Health) अनेक आजारांचा धोका वाढतो. यासाठी आहार आणि नियमित व्यायामाची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या खराब सवयींमुळे वयाच्या 30 व्या वर्षानंतर पुरुषांमध्ये (Men's Health) अनेक आजारांचा धोका वाढतो. यासाठी आहार आणि नियमित व्यायामाची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

हाडे कमकुवत होणे

'झी न्यूज'ने दिलेल्या बातमीनुसार वयाच्या 30 व्या वर्षानंतर काहींची हाडे कमकुवत होऊ लागतात. हाडांशी संबंधित आरोग्य समस्या टाळण्यासाठी कॅल्शियम युक्त गोष्टी खाणं गरजेचं आहे. त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होईल. रोज एक ग्लास दूध पिणे फायदेशीर आहे.

हृदयरोग (Heart problem)

अलिकडे वयाच्या 30 वर्षांनंतरच पुरुषांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतो. खाण्याच्या सवयींमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. हृदयविकार टाळण्यासाठी आहाराची विशेष काळजी घ्यावी.

लठ्ठपणा

जर तुम्ही नियमित व्यायाम केला नाही तर चयापचय प्रक्रिया मंद होते आणि त्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो. लठ्ठपणा टाळण्यासाठी आहार आणि जीवनशैलीकडे योग्य लक्ष द्या.

हे वाचा - Stomach Pain: थंडीच्या दिवसात तुम्हीही पोटदुखीनं त्रस्त आहात का? हे घरगुती उपाय ठरतील गुणकारी

टक्कल पडण्याची समस्या

३० वर्षांनंतर पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या उद्भवू शकते. यामागे तुमचा आहार आणि जीवनशैलीही महत्त्वाची भूमिका बजावते. प्रथिने, कॅल्शियम, फायबरयुक्त पदार्थ खावेत. दररोज व्यायाम करा, तणाव कमी करा आणि वेळेवर झोपण्याची सवय लावा.

हे वाचा - Skin Care: चेहऱ्यावरील स्ट्रेच मार्क्स, डार्क सर्कल्सवर रामबाण उपाय आहे स्वयंपाक घरातील ही डाळ

प्रोस्टेट कॅन्सर

वयाच्या 30 व्या वर्षानंतर पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढतो. यामुळे, वारंवार शौचास जाणे आणि रात्री लघवीला जळजळ होण्याची समस्या असू शकते. ही लक्षणे ताबडतोब ओळखून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips