Home /News /lifestyle /

पॅसिव स्ट्रेचिंग करा आणि हृदयरोग, मधुमेह टाळा; कसं करायचं?

पॅसिव स्ट्रेचिंग करा आणि हृदयरोग, मधुमेह टाळा; कसं करायचं?

आपल्याला हृदयरोग (Heart disease) आणि मधुमेह (diabetes) सारख्या आजारांपासून दूर राहायचे असेल तर स्ट्रेचिंग खूप उपयुक्त ठरू शकते. कसं करायचं हे पॅसिव्ह स्ट्रेचिंग?

 • myupchar
 • Last Updated :
  जर आपल्याला हृदयरोग (Heart disease) आणि मधुमेह (diabetes) सारख्या आजारांपासून दूर राहायचे असेल तर स्ट्रेचिंग खूप उपयुक्त ठरू शकते. शरीर ताणणे म्हणजे शरीराच्या वेगवेगळ्या भागातील स्नायूंचा व्यायाम. आपल्या रोजच्या व्यायामात स्ट्रेचिंग सामील करने फायदेशीर ठरू शकते. myupchar.com च्या नुसार स्ट्रेचिंग हा व्यायाम देखील कोणत्याही व्यायाम प्रकारातील एक विशेष भाग असतो, कारण यामुळे स्नायूंचे कार्य सुधारण्यास मदत होते, दुखापतीची शक्यता कमी होते आणि शरीराची लवचिकता वाढते. स्ट्रेचिंगचा एक प्रकार पॅसिव स्ट्रेचिंग देखील आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीस एकाच स्थितीत राहावं लागतं, तर त्याचा दुसरा साथीदार किंवा काही अन्य साधन ताणून वेग वाढवण्यासाठी शरीरास बाह्य दबाव देते. आणखी एक प्रकारचं स्ट्रेचिंग म्हणजे सक्रिय स्ट्रेचिंग आहे. शरीरसौष्ठवाची आवड असणाऱ्या लोकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. यामध्ये, आपली मर्यादा किंवा तणाव पोचेपर्यंत व्यक्ती आपले शरीर ताणते आणि त्याच स्थितीत काही सेकंद रहाते. आपले स्नायू बळकट करण्याव्यतिरिक्त लवचिकता वाढविणे असे अनेक फायदे ताणण्याच्या व्यायामाने होतात. पॅसिव स्ट्रेचिंग रक्ताभिसरण सुधारण्यास आणि हृदयरोग दूर ठेवण्यास मदत करते. एका नवीन अभ्यासाने देखील याची पुष्टी केली आहे की पॅसिव स्ट्रेचिंग रक्तवाहिन्यांचा कडकपणा कमी करून त्या पातळ होण्यास मदत करतात त्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. जर्नल ऑफ फिजियोलॉजी यात प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की रक्ताभिसरण सुधारल्याने पक्षाघात, हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि मधुमेह कमी करण्यास मदत होते. संशोधकांचा असा विश्वास आहे की जर भविष्यातील अभ्यासांमध्ये रक्तवहिन्यासंबंधी आजार असलेल्या रुग्णांमध्ये अशाच प्रकारचे परिणाम दिसून आले आणि या व्यायामाच्या फायद्याच्या परिणामकारकतेची पुष्टी होऊ शकली तर, पॅसिव स्ट्रेचिंग त्यावरील उपचारांसह त्यांना रोखण्यासाठीची नवीन थेरपी देखील होऊ शकते. सुपाइन सिंगल लेग स्ट्रेच
  • आपल्या पाठीवर टेकून फरशीवर झोपा आणि उजवा पाय ताठ फरशीवर ठेऊन डावा पाय वर उचला.
  • डाव्या मांडीला दोन्ही हातांनी धरून आपल्या शरीरा कडे खेचा. हे करण्यासाठी आपण टॉवेल किंवा पट्टा वापरू शकता. पाय खेचताना, आपला पाय हळूवारपणे दाबून हालचालींचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करा.
  • ही स्थिती 1 मिनिट धरून ठेवा आणि हळू हळू पाय सोडा. उलट दिशेने ताणून ही क्रिया पुन्हा करा.
  स्टँडिंग क्वाड्रिसेप्स स्ट्रेच
  • आपला डावा पाय खुर्ची किंवा भिंतीच्या जवळ घेऊन डाव्या हाताने भिंतीचा आधार घेत बॅलन्स करा.
  • आता आपला उजवा गुडघा उजव्या हाताने मागच्या बाजूस वाकवा, आपल्या पायाची टाच आपल्या नितंबकडे घ्या.
  • आपल्या उजव्या हाताने पाय धरून ठेवा. पाय ताणून शरीराजवळ आणण्यासाठी आपण टॉवेल किंवा पट्टा वापरू शकता.
  • आता आपला पाय दाबून हळूवारपणे आपल्या शरीराच्या दिशेने खेचा.
  • 1 मिनिट ही स्थिती धरा आणि हळूहळू उजवा पाय सोडा. डाव्या पायाने या प्रक्रियेची पुनरावृत्ती करा.
  अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - हृदयरोग न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
  First published:

  Tags: Health

  पुढील बातम्या