Home /News /lifestyle /

येत्या दोन आठवड्यात Corona परिस्थिती आणखी बिकट होणार; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

येत्या दोन आठवड्यात Corona परिस्थिती आणखी बिकट होणार; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

हा फक्त साधा थंडी-ताप नाही, जो थोड्या दिवसात बरा होईल. ओमिक्रॉन प्रकारामुळे लोकांचा मृत्यूही होत आहे, त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचेही कटारिया म्हणाल्या. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचे 3,007 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 1,199 बरे झालेत.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 07 जानेवारी : कोरोनाची दुसरी लाट जवळपास आटोक्यात येत असतानाच आता पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यातच कोविड-19 ची परिस्थिती येत्या दोन आठवड्यांत आणखी बिकट होईल, असा इशारा मेदांता हॉस्पिटलच्या वरिष्ठ संचालिका डॉ. सुशीला कटारिया यांनी दिला आहे. कोरोना विषाणूची ही तिसरी लाट (Coronavirus Third Wave) आल्याचे सांगितले जात आहे. हा फक्त साधा थंडी-ताप नाही, जो थोड्या दिवसात बरा होईल. ओमिक्रॉन प्रकारामुळे लोकांचा मृत्यूही होत आहे, त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचेही कटारिया म्हणाल्या. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचे 3,007 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 1,199 बरे झालेत. एएनआयशी बोलताना डॉ. कटारिया म्हणाल्या, "पुढील दोन आठवड्यांत परिस्थिती आणखी बिघडणार आहे. कोविड हा केवळ फ्लू नाही जो निघून जाईल. 4 जानेवारीपासून देशात तिसरी लाट आल्याचे दिसत आहे. गेल्या तीन दिवसात रुग्णांची संख्या जवळपास पाच पटीने वाढली आहे. दुसरी वस्तुस्थिती अशी आहे की, हा विषाणू प्रकार डेल्टा प्रकारापेक्षा कमी तीव्र आहे. परंतु, रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. डॉ. कटारिया यांनी कोविड-19 च्या अनेक रुग्णांवर उपचार केले आहेत. हे वाचा - ATM च्या बाहेर चोर करीत होता पूर्वतयारी, खिशात ब्रँडेड टुथपेस्ट पाहून पोलिसही पडले चाट! डॉ. कटारिया म्हणाल्या की, डेल्टा प्रकारामुळे प्रत्येक 50 व्या किंवा 100 व्या व्यक्तीचा मृत्यू होत होता. ओमिक्रॉनमुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांची संख्या 50 टक्के कमी आहे. जरी हे आकडे बरेच चांगले असले तरी आरोग्य सेवा व्यवस्थेत असलेल्या मुलींसाठी चिंताजनक स्थिती आहे. हा आत्तापर्यंत सौम्य विषाणू प्रकार वाटत असला तरी, आपण काही होणार नाही असे समजून समाधानी राहु शकत नाही. मी तुम्हाला सांगते की, Omicron मुळे जगभरातील लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे या विषाणूला आपल्याला हलक्यात घेऊन चालणार नाही, सदैव सावध राहावे लागेल. हे वाचा - Mumbai Corona : दिवसभरात जवळपास 21 हजार रुग्ण, साडेआठ हजार रुग्णांची कोरोनावर मात ओमिक्रॉन प्रकाराच्या चाचण्यांविषयी, डॉ कटारिया म्हणाल्या की, कोविडचा संसर्ग झाल्याचे आपल्याला आरटीपीसीआर किंवा अँटीजेन किंवा रॅपिड टेस्टद्वारे समजते. परंतु, आजच्या काळात जर एखाद्याला श्वसनाचा त्रास, जुलाब किंवा फक्त अंगदुखी होत असेल तर त्या व्यक्तीने कोविडची लागण झाली असावी असे समजून विलगीकरण करावे आणि चाचणी करून घ्यावी. आरटीपीसीआरद्वारे कोविड आहे की नाही, हे समजेल. पण तो Omicron आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आणखी काही चाचण्या कराव्या लागतील. दरम्यान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, गेल्या 24 तासांत भारतात 1,17,100 नवीन कोविड-19 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील रुग्णवाढीचा दर 7.74 टक्क्यांवर पोहोचला आहे. यासह, देशातील कोविड-19 प्रकरणांचा आकडा 3,52,26,386 वर गेला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona, Corona vaccination, Coronavirus

    पुढील बातम्या