अनवधानाने राहिलेल्या पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण व्हायलाच पाहिजे

अनवधानाने राहिलेल्या पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण व्हायलाच पाहिजे

आपल्या घरात अशा अनेक जागा आहेत जिथे आपण नकळतपणे स्पर्श करीत असतो, आपले हात त्यावर ठेवतो किंवा त्याला खेटून जातो, ज्या कदाचित जंतूंने व्यापलेल्या असतील.

  • Share this:

बघा कशी परिस्थिती असते, मुले म्हणून आपण वैयक्तिक स्वच्छतेस प्राधान्य देतो तर प्रौढ म्हणून विविध गोष्टींचा विचार करतो आणि तोही दिवसरात्र. मात्र याच विचारांची “वाट” लावते रोगांची महामारी. म्हणूनच, आपली लादी स्वच्छ राहावी यासाठी झाकण भरून लिक्विड क्लीनर्स वापरणे एवढ्यावरच अवलंबून राहू नका.

तुम्ही ओंगळ जंतूंना मारण्यासाठी बहुउद्देशीय क्लीनर वापरता. त्यामुळे कदाचित चिकट, बुरशीसारखा स्तर हटवला जाऊ शकेल, मात्र त्याने जीवाणू व विषाणूंचा सर्वनाश होत नाही, विशेषकरून जेव्हा आपण आपल्या घरातील काही महत्त्वाचे कोपरे आणि जागा स्वच्छ करण्यास विसरतो किंवा वगळतो. आपल्या घरात अशा अनेक जागा आहेत जिथे आपण नकळतपणे स्पर्श करीत असतो, आपले हात त्यावर ठेवतो किंवा त्याला खेटून जातो, ज्या कदाचित जंतूंने व्यापलेल्या असतील, मात्र आपण त्याबद्दल अनभिज्ञ असतो.

चला तर पाहुयात अशा काही जागा ज्यांच्याकडे आपण लक्ष देऊन त्या निर्जंतुक करायला हव्यात

भिंती

एखादा सण जवळ आला की घराच्या भिंती साफ करण्याचे काम ठरलेले असते. मात्र सध्याची परिस्थिती बघता केवळ फर्निचर, टेबलटॉप्स किंवा दरवाजा हँडल निर्जंतुक करणे आवश्यक नाही, तर भिंती देखील निर्जुंतक करायला पाहिजेत. स्वच्छता केल्याने केवळ धूळ, बुरशी साफ होईल, विषाणू आणि जीवाणूंचे काय? यासाठीच भिंतींचे निर्जंतुकीकरण व्हायलाच पाहिजे. खासकरून जेव्हा तुमच्या घरात लहानग्यांचा वावर असतो, ते नेहमी भिंतीवर काहीना काही करत असतात, कुठेही स्पर्श करत असतात, तेव्हा त्यांच्या बाबतीत सावधगिरी बाळगायलाच पाहिजे.

तुमच्या फ्रिजचा कोपरा कोपरा जंतूमुक्त करा.

सध्या मार्केटमध्ये अनेक फ्रिज तुमचे अन्न सुरक्षित व जंतूमुक्त ठेवण्याच्या आधुनिक तंत्रज्ञानासह उपलब्ध आहेत. मात्र ते दरवाजाच्या बीजागरी आणि गॅस्केटवर, ओलसर भाजी ठेवण्याच्या ट्रे च्या आत आणि अंडी ठेवण्याच्या स्टोरेजमध्ये जमा झालेली बुरशी आणि जंतूपासून तुमचे संरक्षण करू शकत नाहीत. जरी तुम्हाला ते दिसत नसले तरी त्या-त्या भागांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.

गाडी सुरू करण्यापूर्वी, ती स्वच्छ करा.

सामान्यतः आपण गाडीचे हँडल्स आणि मॅट्स साफ करत असतो. पण एकदा त्या गीअर स्टिक, ग्लोव्ह कम्पार्टमेंट, मीडिया पॅनेल्स, हँडल्स आणि लॉक्सच्या आत, बूट याठिकाणी बारकाईने पाहा. अशा अनेक जागा आहेत जिथे आपण नियमितपणे स्वच्छता ठेवत नाही. याचठिकाणी आपण आपल्या खाण्याच्या वस्तू, आपली कागदपत्रे ठेवत असतो, आपली मनपसंत प्लेलिस्ट सुरू करण्यासाठी स्पर्श करीत असतो. अशा सर्वच ठिकाणी उच्च दर्जाचे जंतुनाशक वापरल्याने तुमचे प्रियजन नक्कीच सुरक्षित राहू शकतात.

तुम्हाला वाटते तेवढे तुमचे बाथरुम स्वच्छ नसते.

जेव्हा बाथरुमसंबंधी चर्चा होते तेव्हा आपण साधारणपणे बहुउद्देशीय क्लीनर वापरून विविध मोठा पृष्ठभाग स्वच्छ करीत असतो. ही स्वच्छता करताना सिंकच्या खालची बाजू, बाथटबच्या सभोवतालच्या लहान-लहान भेगा, टॅप्स आणि फिटिंग्स, वजनकाटा आणि दरवाजे यासारख्या गोष्टी स्वच्छ करायच्या राहून जातात. हे काम एवढे कंटाळवाणे आणि वेळखाऊ असते की ते सुरू करण्यापूर्वीच आपण ‘दमलो’ आहोत, अशी भावना मनात निर्माण होते.

Photo by House Method on Unsplash

 

एक परफेक्ट सोल्यूशन

चेक करा Nerolac Disinfectant HWS 265 ! सर्व प्रकारचे पृष्ठभाग त्वरित आणि अगदी सहज स्वच्छ करता यावेत यासाठी खासकरून बनवलेले.

जसे की, तुमची आवडती जीन्स, जी तुम्ही खूप सारे पैसे खर्च करून, विविध प्रकार ट्राय करून निवडलेली असते. आम्ही म्हणतो, का नाही आपण ट्रायल आणि एरर वगळून, एकच सोल्यूशन वापरावे जे भिंती आणि कपड्यांसह सर्व प्रकारच्या पृष्ठभागांवरील विषाणू, जीवाणू आणि बुरशीसह 99.99% जंतूंचा प्रभावीपणे नायनाट करते.

U.S. EPA प्रमाणित फॉर्म्युलेशन, Nerolac Disinfectant HWS 265 जे आधुनिक 4th जनरेशन क्वाटर्नरी अमोनियम कंपाउंड्स वापरून तयार केले आहे आणि ज्याची 1st जनरेशन क्वाटर्नरी अमोनियम कंपाउंड्सशी तुलना करता उत्कृष्ट जंतुनाशक कामगिरी आहे.

वापरण्यास बाळगण्यास अगदी सोपे.

तुम्हाला फक्त 1L नळाच्या पाण्यामध्ये 4ml कॉन्सेन्ट्रेटेड सोल्यूशन घालायचे आहे. आता तुम्हाला तुमच्या भिंती, कपडे, लादी, उपकरणे, कॅबिनेट्स, सिंक, दरवाजा हँडल्स, सोफा यावर हे सोल्यूशन स्प्रे, वाईप डाउन, मॉप किंवा स्पंज करायचे आहे आणि त्यास सुकू द्यायचे आहे. दहा मिनिटांनंतर पृष्ठभाग वापरण्यास सुरक्षित व तयार होईल. या 500 ml डायल्युटेड सोल्यूशनसाठी तुम्हाला खर्च करावे लागणार आहेत केवळ ₹6.3. वर नमूद केल्याप्रमाणे त्या-त्या भागांकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. आता तुम्हाला जाणीव झालीच असेल की तुमच्याकडे योग्य जंतुनाशक असणे किती महत्त्वाचे आहे. तर मग, आत्ताच निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात करा!

आत्ताच तुमचे प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा: amazon.in/nerolac

*स्टँडर्ड टेस्टिंग प्रोटोकॉलनुसार

First published: December 14, 2020, 5:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या