• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Benefits of eating banana : या वेळात खावं फक्त एक केळ, आरोग्याला होतील जबरदस्त फायदे; आजार राहतील दूर

Benefits of eating banana : या वेळात खावं फक्त एक केळ, आरोग्याला होतील जबरदस्त फायदे; आजार राहतील दूर

केळं हे असं फळ आहे, जे तुम्हाला झटपट ऊर्जा देतं. याशिवाय अनेक गंभीर आजारांपासूनही तुमचं संरक्षण करू शकतं. या बातमीत आपण केळी खाण्याची पद्धत आणि त्याचे फायदे याबद्दल सविस्तर जाणून घेणार (Benefits of eating banana) आहोत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर: काम करताना तुम्हाला लवकर थकवा येत असल्यास किंवा दिवसभर थकवा जाणवत असल्यास ही शारीरिक कमजोरीची लक्षणं असू शकतात. म्हणूनच केळी खाणं हा यावरचा चांगला उपयोग आहे. केळं हे असं फळ आहे, जे तुम्हाला झटपट ऊर्जा देतं. याशिवाय अनेक गंभीर आजारांपासूनही तुमचं संरक्षण करू शकतं. या बातमीत आपण केळी खाण्याची पद्धत आणि त्याचे फायदे याबद्दल सविस्तर जाणून घेणार (Benefits of eating banana) आहोत. केळी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत? केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार केळ्यामध्ये पोटॅशियम असतं. यामुळं आपल्या स्नायूंमध्ये क्रॅम्प येत नाही. केळ्यांमध्ये कार्बोहायड्रेट आढळतं. ते आपल्या शरीराला ऊर्जा देतं आणि आपल्याला थकवा कमी जाणवतो. व्यायामापूर्वी केळी खाल्ल्यास जास्त थकवा जाणवणार नाही. केळीमध्ये आढळतात ही पोषक तत्त्वं (Nutrients found in banana) केळीमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी आणि मॅग्नेशियम आढळतात. याशिवाय व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन-बी6, थायामिन, रायबोफ्लेविन देखील असतात. केळीमध्ये 64.3 टक्के पाणी, 1.3 टक्के प्रथिने, 24.7 टक्के कार्बोहायड्रेट असतं. केळी खाण्याचे फायदे 1. अशक्तपणा दूर होईल केळीमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट असतं. ते खाल्ल्यानं पोट लवकर भरतं. ऑफिस किंवा कॉलेजला जाण्यामुळं सकाळचा नाश्ता चुकला असेल तर, बाहेर पडण्याआधी केळं खा. कारण केळ्यामुळं खाल्ल्याने झटपट ऊर्जा (instant energy) मिळते. 2. डिप्रेशनमध्ये मिळतो आराम केळ्यांच्या सेवनानं नैराश्याच्या (depression) रुग्णांना आराम मिळतो, हे अनेक संशोधनांतून स्पष्ट झालंय. केळ्यामध्ये असं प्रोटीन आढळतं, ज्यामुळे तुम्हाला आराम वाटतो. यामुळेच डिप्रेशनचा रुग्ण जेव्हा केळी खातो, तेव्हा त्याला आराम मिळतो. हे वाचा - या चुकांमुळं हिवाळ्यात वाढतो Heart Attack चा धोका, या गोष्टी टाळणंच ठरेल फायदेशीर 3. बद्धकोष्ठतेपासून आराम केळीमुळं तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. दररोज रात्री झोपताना दुधासोबत इसबगोल भुशी किंवा केळीचं सेवन करावं. असं केल्यानं तुम्हाला बद्धकोष्ठता आणि पोटातील गॅसच्या समस्येपासून आराम मिळेल. 4. पचन सुधारणं केळ्यामध्ये आढळणारे फायबर पचनक्रिया योग्य ठेवते. योग्य पचनशक्ती असण्याचा परिणाम म्हणजे तुम्ही सर्व आजारांपासून दूर राहता. हे वाचा - Mental health: डिप्रेशनमध्ये जाण्याची ही असतात लक्षणं; त्यातून बाहेर काढण्यासाठी मित्र, नातेवाईकांना अशी करा मदत 5. अॅनिमियाच्या (anemia) समस्येवर मात होते अॅनिमिया म्हणजे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असणं. यावर केळी खा. केळीचं सेवन केल्यानं शरीरातील लोहाची कमतरता हळूहळू कमी होते आणि तुमची अॅनिमियाची समस्या देखील सुटते. केळी खाण्याची योग्य वेळ न्याहारीनंतर केळीचं सेवन करावं. केळी खाण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी 8 ते 9. (सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: