Home /News /lifestyle /

काही खाल्ल्यानंतर तुम्हालाही दातात टूथपिक घालायची सवय आहे का? मग आधी हे वाचा

काही खाल्ल्यानंतर तुम्हालाही दातात टूथपिक घालायची सवय आहे का? मग आधी हे वाचा

टूथपिकमुळे (toothpick ) दातात अडकलेले अन्नपदार्थांचे कण बाहेर पडत असतील पण दात आणि हिरड्यांवर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो.

    मुंबई, 30 डिसेंबर : अनेकांना काही खाल्ल्यानंतर टूथपिक किंवा कोणत्याही बारीक काडीनं दात कोरण्याची किंवा टोकरण्याची सवय असते. यामुळे दातातील बारीक कण निघतात आणि आपल्या दात, हिरड्या स्वच्छ राहतात असं तुम्हाला वाटत असेल. तर तुम्ही चुकताय. यामुळे तुमच्या दातात अडकलेले अन्नपदार्थांचे बारीक करण तर बाहेर पडतात पण याचा अर्थ दात स्वच्छ होतात असं नाही. उलट दात आणि हिरड्यांना हानीच पोहोचते (putting a toothpick in the teeth after eating). टूथपिक्सचा (toothpick) जास्त वापर दातांसाठी, हिरड्यांसाठी हानिकारक ठरू शकतो. यामुळं दात कमकुवत होतात, तसंच हिरड्याही खराब होतात. लाकडापासून बनवलेल्या टूथपिक्स हिरड्यांसाठी खूप कठीण असतात. त्यामुळं हिरड्यांमधून रक्तस्राव होतो. याशिवाय, टूथपिकनं घासून दात स्वच्छ केले तर त्यामुळं दातांची चमक कमी होते. जाणून घ्या टूथपिकच्या अतिवापरानं होणाऱ्या गंभीर नुकसानाविषयी - हिरड्यांमधून रक्तस्त्राव जास्त टूथपिक वापरल्यानं हिरड्यांना इजा होऊ शकते. त्यामुळं हिरड्यांमधून रक्तस्राव होतो आणि खाणं-पिणं कठीण होतं. दातांमधील अंतर टूथपिक पुन्हा पुन्हा वापरल्यानं दातांमध्ये अंतर पडू शकतं आणि रिकाम्या जागेत जास्त अन्न अडकतं. त्यामुळं दातांमध्ये पोकळी निर्माण होऊन दात किडायला लागतात. दात कमकुवत होतात अनेक वेळा टूथपिक वापरताना आपण ती चघळायला सुरुवात करतो. यामुळं दातांवरील इनॅमल आवरण खराब होतं. हा थर झिजायला लागतो आणि दात कमकुवत होऊ लागतात. दातांच्या मुळांना नुकसान टूथपिक्सचा सतत वापर केल्यानं दातांची मुळं कमकुवत होतात. कधीकधी टूथपिकचा तुकडा तुटतो आणि दातांमध्ये अडकतो. यामुळं हिरड्या आणि दातांचं आणखी नुकसान होतं. हे वाचा - Patchy Beard: तुमच्याही दाढीचे केस नीट वाढत नाहीत का? जाणून घ्या त्याची कारणे आणि उपाय टूथपिकऐवजी या मार्गांनी दात स्वच्छ करा दात कोरण्याची काडी किंवा प्लॅस्टिकची टूथपिक निर्जंतुक केलेली नसेल तर संसर्ग पसरण्याची भीती असते. म्हणून साधी काडी किंवा प्लास्टिकऐवजी तुम्ही कडुलिंबाची काडी वापरू शकता. ही दातांसाठी फारशी कठीण नसते. तसंच, आपण सामान्य किंवा कोमट पाण्यानं तोंड स्वच्छ धुवू शकतो. असं केल्यानं तोंडाला दुर्गंधी येणार नाही. आपण तोंड माउथवॉशनंही स्वच्छ धुवू शकता. त्यामुळं अडकलेलं अन्न सहज बाहेर येऊ शकतं. रात्रीच्या जेवणानंतर दात घासणंदेखील आवश्यक आहे. हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या