Home /News /lifestyle /

लेकीच्या जन्माच्या 6 महिन्यानंतर कुटुंब हादरलं; दगडासारखं झालंय बाळाचं शरीर, डॉक्टरही शॉक!

लेकीच्या जन्माच्या 6 महिन्यानंतर कुटुंब हादरलं; दगडासारखं झालंय बाळाचं शरीर, डॉक्टरही शॉक!

मिसकॅरेज, , प्रिक्लेम्पसिया आणि वेळेआधी डिलीव्हरी या सगळ्या गोष्टी महिलेच्या इम्युन रिस्पॉन्सने ठरतात. तर, पार्टनरचे स्पर्म देखील याला कारणीभूत असतात.

मिसकॅरेज, , प्रिक्लेम्पसिया आणि वेळेआधी डिलीव्हरी या सगळ्या गोष्टी महिलेच्या इम्युन रिस्पॉन्सने ठरतात. तर, पार्टनरचे स्पर्म देखील याला कारणीभूत असतात.

बाळाच्या जन्मानंतर प्रत्येक घरात आनंदाच वातावरण असतं. त्यात मुलगी असेल तर आनंदाला सीमाचं राहत नाही.

    लंडन, 3 जुलै : बाळाच्या जन्मानंतर प्रत्येक घरात आनंदाच वातावरण असतं. मात्र जर बाळाना कधीही बरा न होणारा आजार असल्याचं कळलं तर घरावर दु:खाचा डोंगर कोसळतो. असाच एक प्रकार ब्रिटेनमध्ये (Britain) जन्माला आलेल्या 6 महिन्यांच्या मुलीसोबत झाला आहे. तिला एक विचित्र आजाराची लागण झाली आहे. (Rare Disease) या आजारात तिचं शरीर दगडाप्रमाणे टणक होत चाललं आहे. डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या या बातमीनुसार, पीडित बाळाचा जन्म 31 जानेवारी 2021 मध्ये ब्रिटेनमध्ये झाला होता. तिचे वडील एलेक्स आणि आई डेव बाळाच्या येण्यामुळे खूप आनंदात होते. त्यांना बाळाच्या आजाराबद्दल माहिती नव्हती. सुरुवातीला मुलगी अन्य बाळाप्रमाणे हालचाल करीत होता. एकेदिवशी मुलीचा पाय दगडासारखे कडक वाटू लागले, यानंतर आई-वडिलांना संशय आला. त्यानंतर मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की, मुलीला Fibrodysplasia Ossificans Progressiva नावाचा आजार झाला आहे. हे ही वाचा-FB वर जुळलं प्रेम; मात्र भारत-पाक सीमा बंद,अखेर तरुणाच्या वडिलांनी केला बंदोबस्त दगडासारखं झालं मुलीचं शरीर Fibrodysplasia Ossificans Progressiva हा जेनेटिक आजार आहे. या आजारात शरीरात मांस कमी होऊ लागतं आणि त्याजागी हाडं दिसून लागतात. एप्रिलमध्ये पहिल्यांदा एक्स-रे दरम्यान कळालं की, बाळाच्या पायामध्ये समस्या आहे. डॉक्टरने सांगितलं की, मुलगी चालू शकणार नाही. यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी या आजाराबद्दल अन्य ठिकाणाहून माहिती जमा केली आणि तपासणी केली. ज्यानंतर मुलीला दुर्धर आजार झाल्याचं समोर आलं. विचित्र आजार पाहून डॉक्टरही हैराण डॉक्टरांनी सांगितलं की, गेल्या 30 वर्षांच्या करिअरमध्ये या आजाराबद्दल नाही ऐकलं आणि नाही वाचलं. या आजारात हाडं स्केलटेनच्या बाहेर विकसित होऊ लागतात. त्यानंतर हाडं शरीराच्या आता मांसाची जागा घेऊ लागतात.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Health

    पुढील बातम्या