मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /बुरशी तयार करते मृत्यूचे जाळे, नराला आकर्षिक करून मादीसोबत सेक्स

बुरशी तयार करते मृत्यूचे जाळे, नराला आकर्षिक करून मादीसोबत सेक्स

कोळ्याचे जाळे असो, वा फुलांच्या मार्फत कीटकांना आकर्षित करून त्यांना खाणारी वनस्पती असो; प्रत्येकाची आपली एक विशिष्ट शैली आहे.

कोळ्याचे जाळे असो, वा फुलांच्या मार्फत कीटकांना आकर्षित करून त्यांना खाणारी वनस्पती असो; प्रत्येकाची आपली एक विशिष्ट शैली आहे.

कोळ्याचे जाळे असो, वा फुलांच्या मार्फत कीटकांना आकर्षित करून त्यांना खाणारी वनस्पती असो; प्रत्येकाची आपली एक विशिष्ट शैली आहे.

    मुंबई, 3 नोव्हेंबर : कित्येक प्राणी, कीटक आणि वनस्पतीही शिकारीसाठी विशिष्ट प्रकारचे ट्रॅप रचत असलेले आपण पाहिले आहेत. कोळ्याचे जाळे असो, वा फुलांच्या मार्फत कीटकांना आकर्षित करून त्यांना खाणारी वनस्पती असो; प्रत्येकाची आपली एक विशिष्ट शैली आहे. यातच आता संशोधकांना अशी एक बुरशी (Fungus uses sex trap) सापडली आहे, जी शिकारीसाठी मृत मादी माशीचे शरीर वापरते. शिकारीची ही अनोखी पद्धत पाहून शास्त्रज्ञही चक्रावले आहेत.

    अँटोमॉफथोरा मस्के (Entomophthora Muscae) असं या बुरशीचं नाव आहे. हार्वर्ड विद्यापीठात मॉलिक्युलर बायॉलॉजिस्ट असणाऱ्या कॅरोलीन एलिया यांनी याबाबत संशोधन केलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बुरशी आधी मादी माशीच्या शरीरात शिरकाव करते. त्यानंतर या मादी माशीचा मृत्यू होतो. यानंतर ही बुरशी मादी माशीच्या शरीरात वेगाने पसरते, आणि आपले कण तिच्या शरीरातून बाहेर फेकू लागते. या कणांच्या वासाने नर माशी मादी माशीकडे आकर्षित होते. मादी माशी एकाच ठिकाणी बसून असल्याची संधी साधून नर माशी तिच्यासोबत सेक्स (Fungus Uses female house fly to attract male) करते. यावेळी ही बुरशी मग नर माशीच्या शरीरात प्रवेश करते. म्हणजेच, एका माशीतून दुसरीकडे जाण्यासाठी ही बुरशी चक्क सेक्स ट्रॅपचा वापर (Fungus that use sex trap) करते. आज तकने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

    या संशोधनासाठी काही प्रयोग करून पाहण्यात आले. कोपेनहेगन विद्यापीठात इव्होल्यूशनरी इकॉलॉजिस्ट हेन्रिक डे फाईन लिट आणि पीएचडी स्टुडंट आंद्रियास नॉनड्रप हॅनसेन यांनी लॅबमध्ये एक प्रयोग केला. त्यांनी एका मादी माशीच्या शरीरात मुद्दाम ही बुरशी (Fungus in house fly) सोडली. ही माशी काही वेळातच मरण पावली. त्यानंतर त्यांनी त्याठिकाणी एक नर माशी सोडली, जिला या बुरशीचे संक्रमण झाले नव्हते. पण काही वेळातच नर माशीने मृत मादी माशीसोबत संबंध (House fly fungus experiment) प्रस्थापित केले. यानंतर लगेचच या नर माशीचाही मृत्यू झाला. या दरम्यान मृत मादी माशीच्या शरीरातून बुरशीने आपले हजारो कण बाहेर फेकले होते.

    क्या बात है! लवकरच उभारली जाणार 'साई युनिव्हर्सिटी'; K. V. रामाणी करणार निर्माण

    दुसऱ्या एका प्रयोगात संशोधकांनी एका मादी माशीला बुरशीने संक्रमित केले, आणि दुसऱ्या निरोगी मादी माशीला सोबत ठेवले. यानंतर त्याठिकाणी एका नर माशीला सोडण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, नर माशीला जिवंत मादी कोणती आणि मृत कोणती यातील फरकच लक्षात आला नाही. संशोधकांनी सांगितले, की बुरशीचे हे कण नर माशीसाठी अफ्रोजिडिएक (Aphrodisiac) प्रमाणे काम करतात. म्हणजेच, ते कण त्याची उत्तेजना वाढवत होते. त्यामुळे जिकडून अधिक उत्तेजना मिळत होती, त्या मादीकडे ती नर माशी गेली.

    वेस्ट व्हर्जिनिया विद्यापीठातील मॅथ्यू कॅसन हे कीटकांना मारणाऱ्या बुरशीचे तज्ज्ञ आहेत. या शोधामुळे तेदेखील चकित झाले आहेत. त्यांनी आता हेन्रिक आणि हॅनसन यांच्याकडून बुरशीचे जीनोम घेऊन त्यावर संशोधन सुरू केले आहे. त्यांनी सांगितले, की या बुरशीचा वासच हिरव्या गवताप्रमाणे (Fungus smells like Green Grass) असतो. तसेच ही बुरशी नर माशीच्या मेंदूवर थेट परिणाम करते. यासाठी संशोधकांनी नर मादीच्या अँटीनावर सूक्ष्म इलेक्ट्रोड लावले होते.

    Team India मध्ये द्रविड पर्व! कोच झाल्यानंतर The Wall ची पहिली प्रतिक्रिया

    दरम्यान, या बुरशीची केमिकल तपासणी केल्यानंतर संशोधकांना समजले की मिथिल-ब्रांच्ड अल्केन्स (Methyl-branched Alkanes) ज्याप्रमाणे नर माशींना मादींकडे आकर्षित करते, त्याचप्रमाणे ही बुरशीही काम करते. मात्र, या बुरशीत असणारे रसायन नेमके कोणते आहे हे संशोधकांना अद्याप समजले नाही. याबाबत अधिक माहिती मिळाल्यास घरात येणाऱ्या माशांना हाकलण्यासाठी या रसायनाचा उपयोग केला जाऊ शकतो, असं संशोधकांनी म्हटले आहे. त्याचवेळी, फुलांचा सुगंध घेताना खबरदारी बाळगण्याचा इशाराही संशोधकांनी दिला आहे. कारण, त्यावर जर अशी संक्रमित मृत माशी बसली असेल, तर ही बुरशी तुमच्या शरीरातही जाऊ शकते.

    First published:
    top videos