मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तीन पाय, तीन हात असलेल्या बाळाचा जन्म; पाहण्यासाठी, पाया पडण्यासाठी लोकांची उसळली गर्दी

तीन पाय, तीन हात असलेल्या बाळाचा जन्म; पाहण्यासाठी, पाया पडण्यासाठी लोकांची उसळली गर्दी

काहीजण मुलाच्या पाया पडण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. तीन हात-पाय असलेलं बाळ पाहण्यासाठी लोक लांबून येत आहेत. तीन हाता-पायाचं बाळ नेमंक असतं कसं हे पाहण्यासाठी लोक गर्दी करत (The birth of a baby with three legs and three arms) आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 31 डिसेंबर : तीन पाय, तीन हात असलेल्या एका बाळाचा जन्म झाला आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वचजण आश्चर्यचकित झाले असून बाळाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. अनेकांनी हा दैवी चमत्कार असल्याचं म्हटलं आहे. बिहारच्या गोपाळगंजमध्ये ही अजब घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे काहीजण मुलाच्या पाया पडण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. तीन हात-पाय असलेलं बाळ पाहण्यासाठी लोक लांबून येत आहेत. तीन हाता-पायाचं बाळ नेमंक असतं कसं हे पाहण्यासाठी लोक गर्दी करत (The birth of a baby with three legs and three arms) आहेत.

या बाळाविषयी उलट-सुलट चर्चा

रबीना खातून या 30 वर्षीय महिलेला प्रसूतीवेदना चालू झाल्यानंतर तिला तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. येथे त्यांनी तीन हात आणि तीन पाय असलेल्या बाळाला जन्म दिला. ही महिला तिचे पती मोहम्मद रहीम अली यांच्यासह वैकुंठपूर येथील रेवतिथमध्ये राहते. बाळाची अवस्था गंभीर असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात

डॉक्टर आफताब आलम यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दोष असल्यानं अशा प्रकारच्या अनैसर्गिक बाळाचा जन्म झाला आहे. लाखामध्ये अशी एखादीच अशी घटना होत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

हे वाचा - Bathroom Stroke: हिवाळ्यात अंघोळ करताना होणारी ही चूक ठरू शकते जीवघेणी; बाथरूम स्ट्रोकबद्दल माहीत आहे का?

बाळाच्या जन्मानंतर कुटुंबीयांना देखील धक्का बसला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कुटुंबीयांनी अल्ट्रासाऊंड चाचणी केली होती. मात्र, अहवालामध्ये याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. तीन हात आणि तीन पाय असलेलं हे बाळ सध्या सर्वत्र कुतुहलाचा विषय झालं आहे. एका हिंदी वेबसाईटनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

First published:

Tags: Small baby