...म्हणून जगभरात पाळला जातो Breastfeeding Week, जाणून घ्या याचं खरं कारण

Breastfeeding Week ज्या बाळांना जन्माच्या 24 तासांच्या आत स्तनपान मिळते, त्यांचा इतर मुलांच्या तुलनेत मृत्यू दरही कमी असतो.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 02:19 PM IST

...म्हणून जगभरात पाळला जातो Breastfeeding Week, जाणून घ्या याचं खरं कारण

आई होणं हा जगातील सर्वोत्तम अनुभवांपैकी एक आहे. याच्याशी निगडीत सर्वच अनुभव हे खास असतात, त्यांन शब्दात मांडता येऊ शकत नाही. याच अनुभवांपैकी एक अनुभव म्हणजे स्तनपान.

आजपासून अर्थात 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत ‘ब्रेस्टफीडिंग वीक’ साजरा केला जातो. यावेळी महिलांना स्तनपानशी निगडीत त्यांच्या अधिकारांबद्दल जागरुक केलं जातं. फक्त मुलांसाठीच स्तनपान फायदेशीर असतं असं नाही तर आईच्या आरोग्यासाठीही फार उपयोगी असतं.

हे सर्व असूनही डब्ल्यूएचओने शेअर केलेल्या आकड्यांनुसार अनेक देशांमध्ये बाळाच्या जन्मानंतर सुरुवातीच्या सहा महिन्यांमध्ये स्तनपान देण्याची टक्केवारी 50 टक्क्याहून कमी आहे. एका मुलाला स्तनपान देणं अत्यंत आवश्यक आहे. आईच्या दुधात मॅक्रोन्यूट्रिएंट्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि बायोएक्टिव्ह घटक असतात जे बाळाच्या वाढीसाठी फार आवश्यक असतात.

यामुळे बाळाची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. स्तनपानामुळे बाळाची शारीरिक आणि मानसिक विकास होण्यास मदत होते. ज्या बाळांना आईचं दूध मिळत नाही त्यांना संक्रमणाचा धोका सर्वाधिक असतो.

तसेच ज्या बाळांना जन्माच्या 24 तासांच्या आत स्तनपान मिळते, त्यांचा इतर मुलांच्या तुलनेत मृत्यू दरही कमी असतो. Disclaimer- या लेखात दिलेली माहिती ही सर्वसामान्य आहे. न्यूज18 लोकमत याला दुजोरा देत नाही. वरील दिलेल्या गोष्टी अमलात आणण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा मार्गदर्शन घ्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 02:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...