झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तापसी पन्नूच्या ट्विटला उत्तर देताना तिचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री सोरेन यांनी लिहिलं की, तुमच्या टीमचा पाहुणचार करायची आम्हाला जी संधी मिळाली, त्यामुळं आम्ही भारावून गेलो आहोत. राज्यातील खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आमचे सदैव प्रयत्न सुरू राहतील. तापसीच्या या आगामी चित्रपटात झारखंडमधील खेळाडू आणि खेळाशी संबंधित लोकांनाही काम करण्याची संधी मिळाली आहे. खेळाच्या एका सीनमध्ये बरेच खेळाडू तिच्यासोबत धावपट्टीवर धावले आहेत. तसेच रांची जिल्ह्याचे खो-खो युनियनचे महासचिव अजय झा या चित्रपटात शर्यत सुरू करताना दिसणार आहेत. त्याचबरोबर अॅथलेटिक्स असोसिएशनचे शशांक भूषण अँकरिंग करताना दिसणार आहेत. या सर्वांनी सांगितलं की, तापसीबरोबर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये काम करणं उत्साहपूर्ण होतं. खेळाशी संबंधित तापसी पन्नूचा हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी तिनं सूरमा आणि सांड की आंख या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.What a wonderful experience to shoot in Ranchi,Jharkhand. My first time in the city and taking back some really good memories and an after taste of litthi chokha:) Amazing world standard tracks and stadiums 👌🏼
— taapsee pannu (@taapsee) December 24, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food