सावधान! थर्मोकॉलच्या कपामध्ये चहा पिण्याआधी हे वाचा; होतील गंभीर परिणाम

सावधान! थर्मोकॉलच्या कपामध्ये चहा पिण्याआधी हे वाचा; होतील गंभीर परिणाम

तुम्ही याचा कधी गांभीर्याने विचार केला आहे का की, ते तुमच्या शरीराकरीता हानिकारक आहे आणि त्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या थर्मोकॉलच्या कपामध्ये चहा पिल्याने कोणते परिणाम होतात.

  • Share this:

मुंबई, 26 जुलैः भारतात चहा पिण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. कागदी आणि थर्माकोलच्या कपात अगदी सर्रास चहा प्यायला जातो. मोठमोठ्या कंपन्या असणाऱ्या मेट्रो शहरांमध्ये चहाचा खप वाढताना दिसत आहे. फक्त टपरीवरचा चहा नाही तर आता चहाविक्रीच्या फ्रॅंचाईजीसुद्धा जागोजोगी दिसत आहेत. एकूणच चहाला सर्वात जास्त पसंती आहे. कोणताही ऋतु असो चहा लागतोच. त्यामुळे गरमागरम चहा पिण्यासाठी अनेकजण वाट धरतात ती चहाच्या टपरीकडे. अनेकदा हा चहा थर्मोकॉलच्या कपांमध्ये दिला जातो. पण, तुम्ही याचा कधी गांभीर्याने विचार केला आहे का की, ते तुमच्या शरीराकरीता हानिकारक आहे आणि त्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या थर्मोकॉलच्या कपामध्ये चहा पिल्याने कोणते परिणाम होतात.

World Population Day : ही आहेत जगातली सर्वाधिक गर्दीची 10 शहरं

 तज्ञांच्या माहितीनुसार, थर्मोकॉलच्या कपामध्ये चहा पिणं अत्यंत हानिकारक आहे. थर्मोकॉल हे पॉलीस्टीरिन या घटकापासून तयार केलं जातं. त्यामुळे या कपांमधला चहा पिताना थर्मोकॉलमधील घटक शरीरात जातात. हे घटक कर्करोगाचं कारणही होऊ शकतात. एवढंच नाही तर, या घटकामुळे थकवा, लक्षकेंद्रीत न होणे, हार्मोनमध्ये असमतोल अशा समस्यादेखील ओढावतात.रोज अशा थर्मोकॉलच्या वापरामुळे त्वचेलादेखील त्रास होऊ शकतो. त्वचेवर लाल चट्टे आणि गळ्यामध्ये त्रास होऊन तो दुखणे अशा समस्याही होऊ शकतात. याशिवाय पोटासंबंधीचे आजार होण्याचा धोकाही आहे. थर्मोकॉलमध्ये असणारे सूक्ष्म जिवाणू आणि बॅक्टेरीया तुमच्या पोटात जाऊन धोका निर्माण होतो.

सावधान! तुमच्या 'या' 3 गोष्टींमुळे जोडीदार जाऊ शकतो दूर

डॉक्टरांच्या मते, थर्मोकॉलच्या या कपांमध्ये कृत्रिम वॅक्स असतं ज्यामुळे त्यातुन द्रव्य पदार्थ पिताना ते गळू नयेत. मात्र, हेच वॅक्स तुमच्या पोटामद्ये जातं आणि त्यामुळे इंनफेक्शन होण्याची संभावना असते. त्याने पचनसंस्थेवरही परिणाम होतो.

अस्वल आलं, त्याने पाहिलं आणि बॉक्सच पळवून नेला, पाहा हा VIRAL VIDEO

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: July 26, 2019, 7:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading