कम बॅकसाठी सानिया मिर्झा तयार, अवघ्या काही महिन्यांत कमी केलं 26 किलो वजन

सुरुवातीला माझं पूर्ण लक्ष हे वजन कमी करण्यावर होतं. पण आता पूर्वीसारखं ट्रेनिंग सुरू केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2019 05:37 PM IST

कम बॅकसाठी सानिया मिर्झा तयार, अवघ्या काही महिन्यांत कमी केलं 26 किलो वजन

हैदराबाद, 02 ऑगस्ट- भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने नुकत्याच एका मुलाखतीत स्पष्ट केलं की, करिअरमध्ये तिने आतापर्यंत एवढं काही सिद्ध करून दाखवलं की, दुसऱ्या इनिंगमध्ये तिला काहीही सिद्ध करून दाखवायचं नाही. पुढच्यावर्षी जानेवारीमध्ये ती कमबॅक करण्याच्या प्रयत्नांत आहे. आई झाल्यानंतर सानियाने दोन वर्षांहून मोठा ब्रेक घेतला. पण आता ती आगामी स्पर्धेची तयारी करत आहे. 32 वर्षांची सानिया रोज चार तास टेनिसची प्रॅक्टिस करत आहे. याशिवाय या काळात तिने स्वतःचं 26 किलो वजनदेखील कमी केलं.

आपल्या करिअरमध्ये सानियाने आतापर्यंत सहा डबल्स ग्रँडस्लॅम किताब जिंकले. तसेच ती जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावरही होती. याशिवाय स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगिससोबत तिने डब्ल्यूटीएच्या अनेक स्पर्धा जिंकल्या.

सानियाने एका मुलाखतीत म्हटलं की, ‘माझ्या करिअरमध्ये मी एवढं काही मिळवलं ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. आता दुसऱ्या इनिंगमध्ये जे काही असेल ते सर्व माझ्यासाठी बोनस असेल. मला वाटलेलं की मी ऑगस्टमध्ये कमबॅक करेन. पण आता जानेवारीपर्यंत मी कोर्टमध्ये उतरेन असं वाटतं. माझा मुलगा इजहान माझ्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट आहे. जर मी जानेवारीमध्ये कमबॅक केलं तर माझ्यासाठी तो आनंदाचा क्षण असेल. पुन्हा एकदा फिट होण्यासाठी माझ्या मुलानेच प्रेरणा दिली आहे. जर मी कमबॅक करतेय तर मला कोणाला काही सिद्ध करायचे नाही. मला खेळायला आवडतं या कारणामुळेच मी कमबॅक करत आहे.’

पूर्ण फिट नसेल तर खेळणार नाही-

कमबॅकच्या प्रश्नावर पुढे बोलताना सानिया म्हणाली की, ‘नेमकी कधी मी खेळायला उतरणार याचा अजून विचार केलेला नाही. माझं शरीर किती फिट आहे याकडे मला लक्ष द्यावं लागेल. पुढच्या दोन महिन्यांत मला याचा अंदाज येईल. जर मी पूर्ण फिट नसेन तर कोणत्याही स्पर्धेत उतरणार नाही. कमबॅक करून पुन्हा दुखापत ओढवून घेण्यात काहीच अर्थ नाही.’

Loading...

आई झाल्यानंतर फार कमी खेळाडूंना आपला फॉर्म सांभाळून ठेवता आला. यात मार्गरेट कोर्ट, इवोने गूलागोंग आणि किम क्लायस्टर्स यांनी मातृत्वानंतर अथक मेहनत घेऊन किताब जिंकले. सध्याच्या खेळाडूंमध्ये आई झाल्यानंतर फार कमी खेळाडूंना सर्वोत्कृष्ट 50 खेळाडूंच्या यादीत येण्यात यश आलं आहे. मात्र अमेरिकेची सेरेना विलियम्स ही एक खेळाडू आहे जी मातृत्वानंतरही जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे.

 

View this post on Instagram

 

The feeling when you roll your arm over to hit serves after a year and a half ‍♀️ ‍♀️

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar) on

सेरेनासारख्या खेळाडूंकडून प्रेरणा मिळते-

सानिया म्हणाली की, ‘कमबॅकसाठी अनेकजण प्रेरणास्थानी आहेत. सेरेनासारख्या खेळाडू आई झाल्यानंतर ग्रँडस्लॅम खेळताना पाहून आनंद होतो. ती खरंच प्रेरणादायी आहे. मला पूर्वीसारखंच सशक्त असल्यासारखं वाटत आहे. पण अजूनही गुडघ्यांचा त्रास जाणवत आहे. हे दुखणं पूर्णपणे बरं झालेलं नाही. गरोदर राहण्यापूर्वी माझ्या गुडघ्याला दुखापत झाली होती. यामुळेच 2017 च्या शेवटाला मी खेळणं सोडलं होतं.’

आपल्या ट्रेनिंगबद्दल बोलताना सानिया मिर्झा म्हणाली की, ‘मी रोज तीन ते चार तासांच्या दोन सेशनमध्ये फिटनेसवर काम करत आहे. सुरुवातीला माझं पूर्ण लक्ष हे वजन कमी करण्यावर होतं. पण आता पूर्वीसारखं ट्रेनिंग सुरू केली आहे. अपेक्षा तर भरपूर आहेत. पण सर्व काही ठीक झालं तर टोकियो ऑलिंपिकमध्ये मी कमबॅक करेन.’

या आहेत महिन्याला कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या सर्वात श्रीमंत महिला सीईओ!

Friendship Day 2019: प्रत्येकाकडे असलेच पाहिजेत असे मित्र, तुमच्याकडे आहेत का?

शारीरिक संबंधांशिवाय शरीरात होतात हे घातक बदल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2019 04:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...