Love Story : 'या' स्टार महिला खेळाडूनं केलं ब्युटी क्वीनशी लग्न

Love Story : 'या' स्टार महिला खेळाडूनं केलं ब्युटी क्वीनशी लग्न

या लग्नाला ब्रुक शिल्ड आणि क्रिस एवर्टसारखे दिग्गज उपस्थित होते. दोघीही आपल्या संसारात खूश आहेत आणि व्यग्रही.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : टेनिस क्षेत्रात काही वर्षांपूर्वी दोन महिला टेनिसपटूंमध्ये युद्धच सुरू झालं होतं. मार्गरेट कोर्टनं मार्टिना नवरातिलोवावर निशाणा साधत समलिंगी लग्नाला विरोध केला होता. खूप वादंग झाला हातो. त्यावेळी मार्टिना सगळ्यांवर तुटून पडली होती. अर्थात, मार्टिनाची प्रेमाची गाडी तिची सुंदर जोडीदार ज्युलिया लेमिगोवासोबत चांगली चालली होती.

टेनिसची महान खेळाडू मार्टिनानं रशियाची ब्युटी क्वीन ज्युलियाबरोबर 10 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न केलं. मार्टिनानं न्यूयाॅर्कमध्ये लग्न केलं तेव्हा ती 58 वर्षांची होती आणि ज्युलिया 42 वर्षांची.

या लग्नाला ब्रुक शिल्ड आणि क्रिस एवर्टसारखे दिग्गज उपस्थित होते. दोघीही आपल्या संसारात खूश आहेत आणि व्यग्रही. लेमिगोवाला दोन मुली आहेत. मार्टिनाचा व्यवसाय, सामाजिक कार्य सुरू आहे. ज्युलिया पॅरिसला स्किन केअर कंपनी चालवतेय.

बेधडक मार्टिना

मार्टिना युगोस्लाव्हियात 18 आॅक्टोबर 1956ला जन्मली. तेव्हा साम्यवादी सरकार होतं. आयुष्यावर सरकारचं नियंत्रण होतं. मार्टिनाचं बालपण इतकं सहज नाही गेलं. लहानपणी तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. आईचे दुसरे पती मिरेक नवराती मार्टिनाचे पहिले टेनिस कोच होते. आपल्या सावत्र वडिलांच्या ती जवळ होती, की तिनं त्यांचंच नाव लावलं.

बंडखोर मार्टिना

18 वर्षांची असताना तिनं टेनिस स्पर्धांमध्ये प्रवेश केला. ती अमेरिकेला गेली ती परतलीच नाही. मार्टिनाची जीवनशैली नेहमीच प्रश्नांकित राहिलीय. तिनं अनेकदा पुरुषप्रधानतेला धक्के दिलेत. ती समलैंगिक आहे अशी कुजबुज सुरू झाली होती. महान खेळाडू बिली जीन सिंगसोबत तिचे संबंध असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा होती. मार्टिनासला 1981मध्ये अमेरिकन नागरिकत्व मिळालं होतं. त्यानंतर एका काॅलमद्वारे आपल्याला पुरुषांबद्दल आकर्षण वाटत नाही, स्त्रियांबद्दल वाटतं तिनं कबूल केलं होतं.

पालक म्हणायचे मार्टिनापासून दूर राहा

80च्या दशकात अमेरिकेत समलैंगिकतेबद्दल कुठलाही कायदा नव्हता. त्यामुळे महिला खेळाडूंचे आईवडील त्यांना मार्टिनापासून दूर राहायला सांगायचे.

ज्युडीशी प्रेम आणि भांडण

80च्या दशकात मार्टिनाचं नाव अमेरिकेतल्या नागरिक आंदोलनाच्या लेखिका रिटा ब्राऊनशी जोडलं गेलं. त्यानंतर अनेक महिलांशी. अमेरिकेत हळूहळू समलैंगिकतेला मान्यता मिळायला लागली. 1983मध्ये मार्टिनाच्या आयुष्यात आली ज्युडी नेल्सन. मिस टेक्सास असलेल्या ज्युडीचे दोन मुलगे होते. दोघींनी एकत्र राहायचा निर्णय घेतला. ज्युडीनं पुस्तक लिहिलं, चाॅइस माय जर्नी आफ्टर लीविंग माय हसबंड फॉर मार्टिना अँड अ लेस्बियन लाइफ. काही वर्षांनी दोघींचं काही पटेना. वेगळं होताना ज्युडीनं मार्टिनाकडे संपत्तीतला वाटा मागितला. प्रकरण कोर्टात गेलं.

मार्टिनाच्या डोळ्यात अश्रू

खटल्याच्या वेळी मार्टिनाच्या डोळ्यात अश्रू आले. ती रडली. बदनामासोबत संपत्तीही हातून जात होती. मार्टिनानं कोर्टाबाहेर समझोता केला. ज्युडी नेल्सन नंतर लेखिका बनली. तिनं 'लव मॅच नेल्सन वर्सेस नवरातिलोवा' पुस्तक लिहिलं. ते खूप चाललं.

टोनी लेटनबरोबर रोमान्स

2000मध्ये मार्टिना आणि टोनी लेटन यांच्या डेटिंगच्या बातम्या यायला लागल्या. दोघांनी लग्नही केलं. पण नंतर दोघं दुरावले. टोनीनं मार्टिनावर कोर्टात खटलाही भरला होता.

ज्युलिया आॅफिशियल बायको

मार्टिना आणि ज्युलियानं 2014मध्ये लग्न केलं. मार्टिना म्हणाली ज्युलिया लेमिगोवाच्या मुलीनंच तिला आईशी लग्न कर म्हणून सांगितलं. ज्युलिया खूप आकर्षक होती. सुरुवातीला दोघींनी आपलं प्रेम लपवलं. पण नंतर ते मान्य केलं.

कोण आहे ज्युलिया लेमिगोवा?

लेमिगोवा पूर्व सोव्हिएत संघाच्या कर्नलची मुलगी. ती मिस सोव्हिएत होती. तिला पहिल्या लग्नापासून दोन मुली आहेत. तिचा नवरा फ्रान्सचा बँकर होता. त्याचा खून झाला. त्यानंतर ती मार्टिनाच्या जवळ आली. मार्टिना म्हणते, आता कुठे तिला खरी जीवनसाथी मिळालीय.

 

First published: February 20, 2019, 8:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading