या 10 गोष्टी फ्रिजमध्ये का ठेवू नयेत? फ्रिजमध्ये ठेवल्यानं काय परिणाम होतो?

प्रत्येक वस्तू आपण खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये ठेवत असतो. उरलेले अन्नपदार्थही फ्रिजमध्ये ठेवतो. अन्नपदार्थ खराब होऊ नये यासाठी या वस्तू फ्रिजमध्ये ठेवणं टाळावं.

  • Share this:

प्रत्येक गोष्ट फ्रिजमध्ये ठेवल्यानं ती ताजी राहते असा एक समज आहे. मात्र प्रत्येक वस्तू, पदार्थांबाबत ते लागू होतंच असं नाही. अशाही काही वस्तू आहेत ज्या फ्रिजमध्ये न ठेवणं आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं फायद्याचं आहे.

बटाटा- बटाटा स्वयंपाकघरात थंड वातावरण ठेवावा. बटाटा फ्रिजमध्ये ठेवल्यानं त्यातील स्टार्चचं रूपांतर शुगरमध्ये होतं त्यामुळे चव बदलते. फ्रिजमधील बटाट्याचा उकडल्यानंतर रंगही बदलतो.

कांदा- कांदा फ्रिजमध्ये ठेवल्यानं त्याचा वास फ्रिजमध्ये पसरतो. त्यामुळे फ्रिजमधील अन्नपदार्थ खराब होण्याची शक्यता असते. उदा. दूध  कांदा फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर त्याला अधिक पाणी सुटल्यानं तो खराब व्हायला सुरुवात होते. कांदा कायम हवा असलेल्या ठिकाणी ठेवा. बंद जागी ठेवल्यानं कांदा सडायला सुरुवात होते.

टोमॅटो- प्रत्येक घरात फ्रिजमध्ये टोमॅटो असतोच. टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्यानं बावतो. त्याची चवही बदलते. टोमॅटो कायम बाहेर जाळी असलेल्या भांड्यात ठेवावेत. कापलेला टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्यानं आंबूस वास येतो.

लसूण- लसणीच्या पाकळ्या सोलून फ्रिजमध्ये ठेवणं चूक आहे.फ्रिजमध्ये ठेवल्यानं त्याला अंकुर फुटतात. त्यातील पाणी निघून जातं. लसूण फ्रिजमध्ये राहिल्यानं रबरासारखी होते.

ब्रेड- फ्रिजमध्ये ब्रेड ठेवल्यानं ब्रेड कडक होतो. ब्रेडची व्हॅलिडिटी वाढत नाही. तो दोन दिवसांत संपवणं गरजेचं असतं. थंड तापमानामुळे ब्रेडला लवकर बुरशी येऊ शकते.

मध- मध फ्रिजपेक्षा बाहेर खोलीतील वातावरणात ठेवल्यास अधिक काळ टिकते आणि ताजे रहाते. फ्रिजमध्ये ठेवल्यानं काही वेळा मधाच्या गुठळ्या होतात.

अ‍ॅव्होकॅडो- हे एक फळ आहे. फ्रिजमध्ये ठेवल्यानं अ‍ॅव्होकॅडो फळ पिकत नाही. पिकलेलं फळ ठेवलं तर ते लवकर खराब होतं. या फळाला केळ्याजवळ ठेवल्यास फळ लवकर पिकतं असाही दावा केला जातो.

केळ- कच्ची केळी तुम्ही फ्रिजमध्ये ठेऊ शकता. पिकलेली किंवा तयार झालेली केळी फ्रिजमध्ये ठेवल्यानं खराब होतात. केळ्याची साल काळी व्हायला सुरुवात होते.

कलिंगड- कलिंगडाचा गुणधर्म थंड असतो. फ्रिजमध्ये ठेवल्यानं अधिक थंडपणा फळात उतरतो. फळातील न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी होते. तुम्हाला थंड करून कलिंगड खायचं असेल तर अ‍ॅल्युमिनियम फॉईलमध्ये कलिंगडाच्या फोडी बंद करून ठेवाव्यात.

ऑलिव्ह ऑइल - फ्रिजमध्ये ठेवल्यानं ते अधिक चिकट  होतं. ऑलिव्ह ऑइल फ्रिजमध्ये हार्ड बटरसारखं होतं. त्यामुळे ऑलिव्ह ऑइल बाहेर ठेवावं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 06:59 AM IST

ताज्या बातम्या