मुंबई, 17 मार्च : सौंदर्य प्रसाधने आणि ज्वेलरी (Jewellery) हा महिलांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यातही ज्वेलरी कलेक्शन बाबत (Jewellery collection) महिलांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. जाहिराती (Advertise) किंवा सोशल मीडिया (Social Media) पोस्टद्वारे अनेक ज्वेलरी व्यावसायिक आपल्याकडील विशेष डिझाईन्स, नवीन कलाकृती ग्राहकांसमोर ठेवत असतात. या डिझाईन्सला विशेषतः महिलांची चांगली पसंती मिळते. तसेच यामुळे ग्राहकांना जगभरातील नवनवीन ट्रेंड विषयी (Trend) देखील माहिती मिळते. सध्या सोशल मीडीयावर अशाच एका विचित्र नेकलेसचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
इटालियन लक्झरी फॅशन हाऊस (Italian Luxury Fashion House) बोटेगा वेनेटाने या नेकलेसची ( Necklace) निर्मिती केली आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच ती मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Viral) झाली असून त्यास 65 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
View this post on Instagram
आजतकच्या वृत्तानुसार, बोटेगा वेनेटानं या नेकलेसची निर्मिती केली असून हा हार एखाद्या टेलिफोन कॉर्डसारखा दिसतो. बोटेगा वेनेटानं हा हार विक्रीसाठी ठेवलेला आहे. हा टेलिफोन कॉर्डसारखा (Telephone Cord) दिसणारा हार पाहून तुम्हाला क्षणभर ही घरात दररोज वापरली जाणारी यूएसबी केबल आहे का असेही वाटेल. कारण हा या हाराची रचनाच कॉर्डसारखी आहे. हा हार क्लासिक टेलिफोन कॉर्डप्रमाणेच दिसतो.
हे वाचा - सुंदर दिसण्याच्या नादात सडलं नाक; टीव्ही स्टारला कॉस्मेटिक सर्जरी पडली महागात
लोकप्रिय इन्स्टाग्राम पेज (Instagram page) डाईट प्राडानं आपल्या फॅशन कलेक्शनमध्ये बोटेगा वेनेटाच्या या हाराचे (नेकलेस) फोटो शेअर केले आहेत. परंतु याची किंमत ऐकून तुम्ही क्षणभर नक्कीच हैराण व्हाल. या हाराची किंमत 2000 अमेरिकी डॉलर म्हणजे 1 लाख 45 हजार रुपये आहे. डाईट प्राडानं 2000 डॉलर्स मूल्य असलेला हा हार एका कोलाजमध्ये सजवलेला आहे. टेलिफोन कॉर्ड आणि हा हार यांच्यातील फरक दाखवण्यासाठी 5 डॉलर म्हणजेच 362 रुपयांची खरी टेलिफोन कार्ड कोलाज करताना या नेकलेससोबत ठेवण्यात आली आहे. टेलिफोन कॉर्डप्रमाणे दिसणाऱ्या या हाराची निर्मिती एनामेल्ड स्टर्लिंग चांदीपासून केली जाते. हा नेकलेस हूकसह येतो. या व्यतिरिक्त हा हार हिरव्या, निळ्या आणि पांढऱ्या अशा तीन विविध रंगांमध्ये उपलब्ध आहे.
हे वाचा -आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत मिळतोय Apple MacBook Pro;iPhoneवरही 6000ची सूट
डाईट प्राडानं या नेकलेसचे फोटो शेअर करताच ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या फोटोना आतापर्यंत 65000 वर लाईक्स मिळाले आहेत. या टेलिफोन कॉर्डसारख्या दिसणाऱ्या नेकलेसची विक्री करण्यासाठी छायाचित्रे शेअर होताच या लक्झरी ब्रॅण्डला युझर्स जोरदार ट्रोल करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Women