Home /News /lifestyle /

ऐतिहासिक! पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ‘या’ क्षेत्रात प्रथमच दोन महिलांची निवड

ऐतिहासिक! पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ‘या’ क्षेत्रात प्रथमच दोन महिलांची निवड

तेलंगणा (Telangana) राज्यातील श्रीशा आणि भारती यांची लाईनवूमन (Linewomen) म्हणून निवड झाली आहे. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या आणखी एका क्षेत्रात महिलांनी मोठ्या संघर्षानंतर पहिलं पाऊल टाकलं आहे.

    हैदराबाद, 24 डिसेंबर : स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी करत असताना आजही काही क्षेत्रांमध्ये महिलांना प्रवेश नाही. शारीरिक क्षमतेचं कारण देत या क्षेत्रांमध्ये महिलांचा प्रवेश रोखण्याचे प्रयत्न झाले. मात्र हे प्रयत्न संघर्षातून आणि कायद्याच्या माध्यमातून महिला मोडून काढत आहेत. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या आणखी एका क्षेत्रात महिलांनी मोठ्या संघर्षानंतर पहिलं पाऊल टाकलं आहे. तेलंगणा (Telangana) राज्यातील श्रीशा आणि भारती यांची लाईनवूमन (Linewomen) म्हणून निवड झाली आहे. हैदराबादमधील (Hyderabad) ट्रेनिंग ग्राऊंडवर झालेल्या पोल टेस्ट (Pole Test) या दोघींनी आठ मीटर उंचीचा विजेचा खांब सहज सर केला. त्यानंतर त्यांची या पदावर नियुक्ती झाली आहे. त्या देशातील पहिल्या 'लाईनवूमन' आहेत. अर्थात अजूनही त्यांचे कागदोपत्री पद हे ‘ज्यूनिअर लाईनमन’ असंच आहे. ‘ही निवड व्हावी म्हणून आम्ही खूप संघर्ष केला आहे. आमची ‘लाईनवूमन’ अशी ओळख निर्माण होण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करु’, अशी भावना श्रीशा यांनी व्यक्त केली. श्रीशा आणि भारती या दोघांनीही ITI मधून इलेक्ट्रेशियनचे शिक्षण पूर्ण केले आहे. (हे वाचा-धक्कादायक! गर्भातील बाळापर्यंत पोहोचतंय प्लॅस्टिक; नाळेत सापडले कण) मोठ्या संघर्षानंतर निवड श्रीशा आणि भारती यांची ही ऐतिहासिक निवड मोठ्या संघर्षानंतर झाली आहे. महिला उमेदवारांना (Women Candidates) शारीरिक मर्यादेचे कारण देत ‘लाईनवूमन’ चे पद नाकारणाऱ्या कंपन्यांना तेलंगणा हाय कोर्टानं (Telangana high court) काही दिवसांपूर्वी मोठा दणका दिला होता. या पदासाठी इच्छूक असणाऱ्या दोन महिला उमेदवारांची तातडीने पोल टेस्ट) घ्यावी असे निर्देश हाय कोर्टाने वीज कंपन्यांना (Power Distribution companies) दिले होते. महिलांसाठी लष्कराची दारं उघडलेली असताना त्यांना ‘लाईनवूमन’ होण्यापासून कसे रोखू शकता? असा प्रश्न या खंडपीठाने सुनावणी दरम्यान विचारला होता. (हे वाचा- कोरोनाविरोधातील प्रतिकारक शक्तीबाबत नवी माहिती समोर; लशीच्या प्रभावाला मिळालं बळ) विशेष म्हणजे वीज कंपन्यांनी यापूर्वी या जागेसाठी 33 टक्के महिला आरक्षण जाहीर केले होते. त्यानंतर महिला वीजेचे खांब चढण्यासाठी असमर्थ असल्याचा दावा करत त्यांनी तो निर्णय मागे घेतला होता. तेलंगणा हायकोर्टाच्या निर्देशानंतर लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या या दोन्ही महिलांची ‘पोल टेस्ट’ घेण्यात आली. विशेष म्हणजे त्यांनी काही मिनिटांमध्ये ती यशस्वीपणे पास करत त्यांच्या क्षमतेवर शंका घेणाऱ्या मंडळींना दणका दिला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Hyderabad, Telangana

    पुढील बातम्या