कायच्या काय! 9 वर्षांच्या मुलानं चक्क LED Bulb गिळला; पुढे नक्की काय घडलं वाचा

कायच्या काय! 9 वर्षांच्या मुलानं चक्क LED Bulb गिळला; पुढे नक्की काय घडलं वाचा

लहान मुलं स्वत:ला कधी काय इजा करून घेतील सांगता येत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार तेलंगणामध्ये (Telangana) घडला.

  • Share this:

हैदराबाद, 05 जानेवारी : लहान मुलांनी चुकून काय-काय गिळल्यानं त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याच्या बातम्या आपण कायमच वाचत असतो. तेलंगणामध्ये (Telangana) मात्र एक मोठीच धक्कादायक घटना घडली आहे. 9 वर्षांच्या मुलानं चक्क एलइडी बल्ब (LED Bulb) गिळला आहे.

तेलंगणाच्या मेहबूबनगर इथला रहिवासी असलेला 9 वर्षांचा प्रकाश मित्रांसोबत रविवारी खेळत होता. त्यानं खेळता-खेळता चक्क एलइडी बल्ब गिळला. त्याला तात्काळ हैदराबादच्या हॉस्पिटलला (hospital) नेण्यात आलं. सतत खोकत असताना त्यानं श्वास घेण्यासही त्रास होत असल्याचं सांगितलं तेव्हा त्याच्या पालकांना ही गोष्ट कळाली.

सोमवारी सकाळी प्रकाशच्या छातीचं सीटी स्कॅन (CT Scan) करण्यात आलं. त्यावेळी त्याच्या फुफ्फुसात (lungs) एलइडी बल्ब जाऊन बसल्याचं समोर आलं. पेडियाट्रिक रिजिड ब्रॉन्कोस्कोपी ही शस्त्रक्रिया प्रकाशवर करण्यात आली. केवळ दहा मिनिटातच तो बल्ब फुफ्फुसातून काढण्यात आला. इतर कुठलाही त्रास शस्त्रक्रियेनंतर झाला नाही. त्यामुळे प्रकाशला लगेचच घरी सोडण्यात आले.

हे वाचा - नागरिकांनो घाबरू नका, पोल्ट्रीबाबत 'हा' महत्त्वाचा अहवाल आला हाती

याबाबत हॉस्पिटलमधील डॉक्टर म्हणाले, "वेळेत झालेल्या उपचारांमुळेच प्रकाशला होऊ शकणारा संभाव्य धोका टळला. आपण अनेकदा 4 ते 5 वर्षांच्या मुलांनी विविध वस्तू गिळल्याच्या घटना पाहतो. त्यात शेंगदाणे, विविध खेळण्यांचे भाग, स्क्रू असं काय काय असतं. मात्र या केसमध्ये तो टोकदार धातूच्या वायरचं टोक असलेला छोटा बल्ब असल्याने गोष्ट धोकादायक होती. मुलाच्या श्वसनलिकेला त्यातून धोका उद्भवला असता. गंभीर अंतर्गत रक्तस्त्रावाचाही धोका होता. ती गिळलेली वस्तू एकदा खूप आत गेली की मग काढणं कठीण बनतं. खुली शस्त्रक्रिया अशावेळी करावी लागते. हा बल्ब जवळपास 12 तास मुलाच्या शरीरात होता"

Published by: News18 Desk
First published: January 5, 2021, 6:12 PM IST

ताज्या बातम्या