Home /News /lifestyle /

"सोडून त्रिशूळ भाला, हाती stethoscope धरला", नवदुर्गा रूपात तेजस्विनीचा डॉक्टरांना अनोखा सलाम

"सोडून त्रिशूळ भाला, हाती stethoscope धरला", नवदुर्गा रूपात तेजस्विनीचा डॉक्टरांना अनोखा सलाम

नवरात्रीच्या (navratri) निमित्ताने अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (tejaswini pandit) शेअर केलेला फोटो कोरोना योद्धांना सलाम करणारा आणि प्रत्येकाला बळ देणारा असा आहे.

  मुंबई, 17 ऑक्टोबर : आज नवरात्री (Navrstri 2020) पहिला दिवस घटस्थापना. नवरात्रीत मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं (tejaswini pandit) फोटोशूटही लक्षवेधी ठरतं. तेजस्विनी दरवर्षी नवरात्रीनिमित्ताने खास फोटोशूट करते. यामध्ये ती देवीची वेगवेगळी रूपं साकारते. या फोटोच्या माध्यमातून कधी ती आदिशक्तीला नमन करते तर कधी स्त्रीशक्तीला सलाम करते. या फोटोंतून ती सामाजिक विषय मांडण्याचा प्रयत्न करते. सध्य स्थितीवर भाष्यं करते. यंदा देशावर कोरोनाचं संकट आहे आणि तेजस्विनी पंडितचं यावर्षी नवरात्रीचं फोटोशूटही त्यावरच आधारित आहेत. तेजस्विनीने नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा फोटो शेअर केला आहे.  या फोटोत तेजस्विनी एका पीपीई किटमध्ये दिसते आहे, तिनं देवीचं रूप घेतलं आहे. पीपीई किटमागे आई देवीच आहे हे दाखवण्याचा तिनं प्रयत्न केला आहे.

  View this post on Instagram

  प्रतिपदा : . . दैत्याने जिंकण्या मला देह तुझाच वेठीस धरला... अन मग मी सोडून त्रिशूळ भाला हाती stethoscope धरला... घुस्मटला जीव जरी हिम्मत तुझी सोडू नकोस आईच उभी आहे PPE किट मागे विसर त्याचा पाडू नकोस, विसर त्याचा पाडू नकोस. . . Design & Illustration : @indian_illustrator Photographer : @vivianpullan Writer : @rjadhishh_live Concept & Director : @dhairya_insta_ . . #navratri2020 #devi #devbarekaro #coronawarriors #thankyou #doctors #nurses #wardboys #healthcareworkers #tejaswwini #gratitude

  A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit) on

  गेल्या कित्येक महिन्यांपासून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी दिवसरात्र रुग्णांसाठी झटत आहेत, त्यांची सेवा करत आहे आणि याच कोरोना योद्धांना तेजस्विनीने अनोखा सलाम केला आहे. तिचा हा फोटो म्हणजे कोरोना योद्धांना सलाम शिवाय कोरोना रुग्णांसह अनेकांना बळ देणाराही आहे. हे वाचा - कोरोना काळात नवरात्रीचा उपवास; शरीर हेल्दी राहण्यासाठी असा असावा आहार या फोटोसह तेजस्विनीने पोस्ट केली आहे, "प्रतिपदा : दैत्याने जिंकण्या मला देह तुझाच वेठीस धरला… अन मग मी सोडून त्रिशूळ भाला हाती stethoscope धरला… घुस्मटला जीव जरी हिम्मत तुझी सोडू नकोस, आईच उभी आहे PPE किट मागे विसर त्याचा पाडू नकोस, विसर त्याचा पाडू नकोस", असं तिनं म्हटलं आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Tejaswini pandit

  पुढील बातम्या