मुंबई, 02 मार्च: कोरोनाविरोधातील लढा जिंकण्यासाठी देशभरामध्ये कोरोना लसीकरण (corona vaccination) मोहीम सुरू आहे. कोरोनावरील लशीचा (Coronavirus Vaccine) दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू झाला आहे. सर्वसामान्यांना कोरोना लस (covid 19 vaccine) दिली जाते आहे. 45 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती ज्यांना इतर आजार आहेत आणि 60 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना ही लस दिली जाते आहे. यानुसार जर तुम्हालाही कोरोना लस मिळणार असेल आणि तुम्हाला ती घ्यायची असेल तर तुम्ही सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रांमध्ये (corona vaccination centres) ती घेऊ शकता. पण आता तुमच्या परिसरात असं लसीकरण केंद्र कुठे आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर काळजी करून नका अगदी घरबसल्यादेखील तुम्ही तुमच्या जवळचं कोरोना लसीकरण केंद्र शोधू शकता.
तुम्हाला घरबसल्या कोरोना लसीकरण केंद्र शोधता येईल अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला याची माहिती मिळेल. मॅप माय इंडिया मूव्हच्या (mapmyindia Move) माध्यमातून तुम्ही कोरोना लसीकरण केंद्राची माहिती मिळवू शकता.
Find nearby corona vaccination centres across India on https://t.co/UOZwdFkmO5 portal & https://t.co/Ypvq5zUUif app! The list is published by @MoHFW_INDIA & mapped by @MapmyIndia. Share with your friends, colleagues, loved ones, and networks across India.#CoronaVaccine pic.twitter.com/3xzuMZ4cPe
— MapmyIndia Move (@MapmyIndiaMove) February 27, 2021
आरोग्य मंत्रालयाकडून कोरोना विषाणू लसीकरण केंद्राची सर्व यादी जाहीर करण्यात आली आहे. मॅप माय इंडियाच्या पोर्टल आणि मोबाईल अॅपवरदेखील तुम्हाला ही माहिती मिळेल.
हे वाचा - Corona vaccine ची जादू; फक्त कोरोनाच नाही तर 'या' आजारांनाही देतेय टक्कर
यावर कोरोना विषाणूवरील लसीकरण केंद्र कुठे-कुठे आहेत याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तर तुम्हाला आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला लस द्यायची असेल तर या अॅपद्वारे नजीकच्या लसीकरण केंद्राची माहिती सहज मिळवू शकता.
या माध्यमातून ठिकाण शोधा -
तुम्हाला मोबाइलमध्ये mapmyindia Move अॅप इन्स्टॉल करावं लागेल.
त्यानंतर कोविड सेक्शनमध्ये जाऊन आपलं ठिकाण टाकावं लागेल.
तुम्हाला ताबडतोब नजीकच्या लसीकरण केंद्राची माहिती मिळेल.
हे वाचा - Covaxin की Covishield; तुम्हाला घेता येईल का तुमच्या पसंतीची कोरोना लस?
दरम्यान, मॅप माय इंडियाचे अॅप भारतातील जवळपास 7.5 लाख गाव, 7500 पेक्षा जास्त शहरी रस्ते, बिल्डिंग यांना कव्हर करते. यासोबतच या अॅपवर देशभरातील सर्व 63 लाख किलोमीटर रोड नेटवर्कचे डिटेल्स आहेत. मॅप माय इंडिया जवळपास 3 कोटी ठिकाणांची माहिती उपलब्ध करुन देते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine