WhatsApp आणतंय नवं भन्नाट फीचर, या ऑप्शनमुळे तुमच्या फोनमधली वाचणार मेमरी

जगभरात वापरलं जाणारं इस्टंट मेसेजिंग अ‍ॅप 'WhatsApp' आपल्या ग्राहकांच्या मागणीनुसार नवनवीन फीचर आणत असतं.

News18 Lokmat | Updated On: Jul 11, 2019 04:54 PM IST

WhatsApp आणतंय नवं भन्नाट फीचर, या ऑप्शनमुळे तुमच्या फोनमधली वाचणार मेमरी

जगभरात वापरलं जाणारं इस्टंट मेसेजिंग अ‍ॅप 'व्हॉट्स अ‍ॅप' आपल्या ग्राहकांच्या मागणीनुसार नवनवीन फीचर आणत असतं. लवकरच 'Quick Edit Media Shortcut' नावाचं फीचरही अ‍ॅपमध्ये उपलब्ध होणार आहे. या फीचरमुळे Sent किंवा Received केलेल्या मीडिया फाइल्स युजर्स सहजरित्या एडिट करू शकणार आहेत. 'WABetainfo'च्या रिपोर्टनुसार, हे फीचर अँड्रॉईड आणि iOS या दोन्ही प्लेटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. दरम्यान, अद्यापही या फीचरचं टेस्टिंग सुरू आहे. तसंच ही फीचर सर्व स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध करून दिलं जाणार की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

(वाचा :World Population Day : ही आहेत जगातली सर्वाधिक गर्दीची 10 शहरं)

या फीचरची खासियत म्हणजे यामुळे वेळ आणि महत्त्वाचे म्हणजे तुमचं फोनमधलं स्टोअरेज वाचण्यास मदत होणार आहे. याद्वारे युजर्स कोणत्याही मीडिया फाइल्स त्वरित एडिट करून कोणालाही सेंड करू शकतात. उदाहरणार्थ, तुम्हाला दुसऱ्या युजरनं एखादा फोटो पाठवला आहे आणि हाच फोटो तुम्ही व्हॉट्स अ‍ॅप चॅटमध्ये क्लिक केल्यानंतर तिथे 'Quick Edit' असं ऑप्शन मिळेल.

(वाचा :सावधान! तुमच्या 'या' 3 गोष्टींमुळे जोडीदार जाऊ शकतो दूर)

यामध्ये तुम्ही फोटो एडिट करू शकता आणि येथून एडिट केलेला फोटो दुसऱ्या कोणालाही फॉरवर्ड करू शकता. म्हणजे हा फीचर उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला फोटो डाउनलोड केल्यानंतर एडिट करण्याची आवश्यकता भासणार नाही.

Loading...

(वाचा :मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तातडीने सोडा ही सवय)

विशेष म्हणजे या एडिट ऑप्शनमुळे मूळ फोटोमध्ये कोणताही बदल होणार नाही. या फीचरमध्ये WhatsApp चॅट्समध्ये Sent किंवा Received फोटोवर टॅप केल्यानंतर तुम्हाला Edit चा पर्याय दिसेल.

SPECIAL REPORT : बॉडी बनवण्यासाठी तुम्ही विष तर घेत नाही ना?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: whatsapp
First Published: Jul 11, 2019 04:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...