Home /News /lifestyle /

लक्षणं दिसण्याआधीच समजणार टीबी; भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने लावला मोठा शोध

लक्षणं दिसण्याआधीच समजणार टीबी; भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने लावला मोठा शोध

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील संशोधकाने एक नवीन रक्तचाचणी शोधली आहे. त्यामुळे TB ची लक्षणं दिसण्याच्या 6 महिने आधीच Tuberculosis चं निदान करणं शक्य आहे.

  लंडन, 22 जानेवारी : दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालवाधीसाठी खोकला, रात्री घाम येणं, थकवा अशी लक्षणं दिसू लागताच डॉक्टर आपल्याला TB ची चाचणी करण्याचा सल्ला देतात. अनेकदा चाचणीत Tuberculosis म्हणजेच क्षय प्रगत टप्प्यावर पोहोचल्यानंतरच समजतं. मात्र जर टीबीची लक्षणं दिसण्याआधीच टीबीचं निदान झालं तर... हे शक्य करून दाखवलं आहे ते भारतीय वंशाच्या संशोधकाने. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील ऋषी गुप्ता यांनी आपल्या टीमसह संशोधन केलं. त्यांनी असे जीन एक्स्प्रेशन सिग्नेचर (Gene expression signatures) शोधलेत, ज्यामुळे टीबीची लक्षणं दिसण्याच्या ६ महिने आधी रक्तचाचणीतून टीबीचं निदान करणं शक्य आहे. द लँसेट रेस्पिरेटरी मेडिसीन जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. संशोधनाचे मुख्य अभ्यासक ऋषी गुप्ता म्हणाले, "रक्तात जर कोणते जीन सिग्नेचर असतील तर त्याचा उपयोग लक्षणांच्या आधीच टीबीचं निदान करण्यासाठी होऊ शकतं. या संशोधनानुसार टीबीच्या निदानासाठी लवकरच नवीन रक्तचाचणी विकसित होईल आणि अनेकांचा जीव वाचवणं शक्य होईल" जागितक आरोग्य संघटनेच्या (WHO) 2019च्या जागतिक टीबी अहवालानुसार, जगभरात 2018 साली जवळपास 10.0 दशलक्ष लोकांना टीबी झाला. जगातील एकूण टीबीच्या प्रमाणांपैकी दोन तृतीयांश प्रमाण असलेले 8 देश आहेत. ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे. भारतामध्ये टीबीचं प्रमाण 27 टक्के आहे. 2030 सालापर्यंत टीबीचं समूळ उच्चाटन करण्याचं लक्ष्य आहे आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. ----- अन्य बातम्या चहा बंद नका करू पण कमी नक्कीच करा, नाहीतर या आजारांमुळे होईल पश्चाताप

  बटाटा खाऊन वजन वाढणार नाही तर कमी होईल! फक्त खाण्याची पद्धत बदला

  हिवाळ्यात कंबरदुखीचा त्रास पुन्हा डोकं वर काढतोय? करून पाहा हे घरगुती उपाय
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Health, Lifestyle

  पुढील बातम्या