• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • तुम्हाला माहिती आहे का? जीवनात ध्येय असेल तर लक्षात ठेवण्याची क्षमता राहते उत्तम

तुम्हाला माहिती आहे का? जीवनात ध्येय असेल तर लक्षात ठेवण्याची क्षमता राहते उत्तम

Target Related To Memory : नुकत्याच झालेल्या एका संशोधनात एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील ध्येयाची भावना आणि वर्तमानातील तपशील लक्षात ठेवण्याची क्षमता यांच्यातील संबंध आढळून (Target Related To Memory) आला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : जीवनात काहीतरी ध्येय असेल तर जीवन आपोआपच शिस्तबद्ध बनतं आणि त्यामुळं मन एकाग्र (Concentrated) राहू लागतं. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील ध्येयाची भावना आणि वर्तमानातील तपशील लक्षात ठेवण्याची क्षमता यांच्यातील संबंध आढळून (Target Related To Memory ) आला आहे. दैनिक जागरणमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या संशोधनाचे निष्कर्ष मेमरी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या  (Florida State University)  संशोधकांच्या नेतृत्वाखालील या अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले आहे की, ध्येय किंवा उद्देशाची भावना आणि संज्ञानात्मक आठवणी लक्षात ठेवणं सोपं करतं. परंतु, फक्त हेतूची भावना चैतन्य आणि सामंजस्याचा लाभ देते. स्मृती कार्य हे नवं संशोधन कोविड-19 महामारीशी संबंधित आठवणींवर केंद्रित आहे. या शोधनिबंधाच्या प्रमुख लेखिका आणि कॉलेज ऑफ मेडिसिनमधील प्रोफेसर अँजेलिना सुटिन म्हणाल्या, 'वैयक्तिक स्मरणशक्तीला प्रत्येकाच्या आयुष्यात खरे महत्त्व असते. स्मरणशक्ती आपल्याला ध्येय निश्चित करण्यात आणि इतरांशी आत्मीयता निर्माण करण्यात मदत करते. हे वाचा - T20 World Cup : शमीचा धर्म काढणाऱ्यांवर विराट संतापला, ट्रोलर्सच्या टीकेवर कॅप्टनचा खणखणीत स्ट्रेट ड्राईव्ह ध्येय नसेल तर लक्षात ठेवण्यात अडचण सुतीन पुढे म्हणाले की, ध्येय निश्चित केल्याने स्मरणशक्ती सुधारते. अशा स्थितीत कोणतीही गोष्ट सहज लक्षात ठेवणे सोपे जाते. पण, जर आपल्या जीवनात कोणतेच ध्येय नसेल तर वर्तमानातील अनेक गोष्टी लक्षात ठेवणं आपल्याला अवघड होतं. हे वाचा - तुम्हीदेखील एकापेक्षा जास्त Credit Card वापरताय? जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे संशोधनात सामील असलेल्या सुमारे 800 लोकांचे असे निष्कर्ष नोंदवण्यात आले की, त्यांच्याकडे जीवनातील उद्देशाची तीव्र भावना आहे त्यांना उद्देशाची कमकुवत जाणीव असलेल्या लोकांपेक्षा लक्षात ठेवणं सोपं होतं. हेतूची तीव्र भावना असलेल्या लोकांमध्ये अधिक सकारात्मकता देखील जाणवली आहे. म्हणजेच ज्यांच्यात उद्देशाची जाणीव कमकुवत होती, त्यांच्यासाठी आठवणी लक्षात ठेवणे अवघड असल्याचे दिसून आलं.
  Published by:News18 Desk
  First published: