मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Tan Removal : टॅनिंगमुळे पाय काळे दिसतायत? काळजी करू नका; फक्त करा हे उपाय

Tan Removal : टॅनिंगमुळे पाय काळे दिसतायत? काळजी करू नका; फक्त करा हे उपाय

त्वचेवरील काळे डाग किंवा हे टॅनिंग आपल्या सौंदर्यात बाधा आणते. बाहेर फिरायला गेल्यावर टॅनिंग होण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी पायावरील टॅनिंग काढण्याचे सोपे उपाय सांगणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 22 नोव्हेंबर : हिवाळ्यातील अनेकांना टॅनिंग होते. शिवाय बरेच आता बीच सारख्या ठिकाणी फिरायला जातात. अशा ठिकाणाहून आल्यावरही टॅनिंगची समस्या येते. या टॅनिंगचा आपल्या त्रास होतोच. मात्र प्रत्येकवेळी ब्युटी पार्लरमध्ये जाणे प्रत्येकाला शक्य होतेच असे नाही. अशावेळी आपल्याला काही घरगुती उपाय उपयोगी येतात. या घरगुती उपायांनी आपले पैसेदेखील वाचतात आणि आपल्या त्वचेला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.

त्वचेवरील काळे डाग किंवा हे टॅनिंग आपल्या सौंदर्यात बाधा आणते. बऱ्याचदा आपण बाहेर फिरायला जातो अशावेळी आपण आपल्या त्वचेची व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सनस्क्रीन वापरणे, मॉईशचरायझर वापरणे आवश्यक असते. अन्यथा टॅनिंग होण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी पायावरील टॅनिंग काढण्याचे सोपे उपाय सांगणार आहोत.

बॉडी Deep Clean करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स, मिळेल ग्लोइंग सॉफ्ट स्किन

टॅनिंग काढण्याचे उपाय

- टाइम्स नाऊने या उपायांबद्दल माहिती दिली आहे. यापैकी कोणताही उपाय करण्यापूर्वी तुमचे पाय स्वच्छ धुवून घ्या. यामुळे पायांवर कोणताही पदार्थ लावणे सोपे जाते आणि त्याचा जास्त फायदा मिळतो. पायांचा काळेपणा जाईपर्यंत हे उपाय करा.

- पहिल्या उपायासाठी तुम्हाला दूध आणि क्रीम लागेल. एका वाटली पाच चमचे दूध आणि एक मोठा चमचा क्रीम किंवा साय घ्या. याचे मिश्रण तयार करून ते पायांवर लावा. नंतर हलके हलके मसाज करा 2-3 तास हे पायावर राहू द्या. नंतर पाय स्वच्छ धुवून घ्या.

- दुसऱ्या उपायासाठी आपल्याला हळद आणि बेसन लागेल. एका वाटीत बेसन आणि अर्धा चमचा हळद घ्या. याचे मिश्रण तयार करून पायांवर लावून किमान 2-3 तास ठेवा. यानंतर पाय धुवून स्वच्छ करा.

- या उपायासाठी आपल्याला ओट्स आणि दही लागेल. ओटस आणि दही घेऊन त्याचे मध्यम मिश्रण तयार करा. हे मिश्रण पायांवर लावा आणि हलके हलके पायांवर घासा. 2-3 तास हे मिश्रण पायांवर लावल्यानंतर पाय स्वच्छ धून घ्या.

गुडघ्यांचा काळेपणा घालवण्यासाठी तुरटी अशी वापरा, त्वचाही होईल मुलायम

- पायांचा काळेपणा काढण्यासाठी तुम्ही दही आणि टोमॅटोदेखील वापरू शकता. एल वाटली टोमॅटोचा रस घ्या आणि त्यात एक चमचा दही मिसळून हे मिश्रण पायांवर लावा. 2-3 तासानंतर पाय धुवून घ्या.

First published:

Tags: Beauty tips, Health, Health Tips, Home remedies, Lifestyle, Skin care