मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /अँटिबायोटिक्सचं अतिसेवन ठरू शकतं घातक, तज्ज्ञांनी सांगितले याचे दुष्परिणाम

अँटिबायोटिक्सचं अतिसेवन ठरू शकतं घातक, तज्ज्ञांनी सांगितले याचे दुष्परिणाम

पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही सौम्य इन्फेक्शनवर उपचार म्हणून अँटिबायोटिक्सचं सेवन करू नये. यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. याबद्दल बेंगळुरूतील अॅस्टर सीएमआय हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसीन विषयाच्या सीनिअर कन्सल्टंट डॉ. बिंदुमती पी. एल. यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही सौम्य इन्फेक्शनवर उपचार म्हणून अँटिबायोटिक्सचं सेवन करू नये. यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. याबद्दल बेंगळुरूतील अॅस्टर सीएमआय हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसीन विषयाच्या सीनिअर कन्सल्टंट डॉ. बिंदुमती पी. एल. यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही सौम्य इन्फेक्शनवर उपचार म्हणून अँटिबायोटिक्सचं सेवन करू नये. यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. याबद्दल बेंगळुरूतील अॅस्टर सीएमआय हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसीन विषयाच्या सीनिअर कन्सल्टंट डॉ. बिंदुमती पी. एल. यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

पुढे वाचा ...
 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 23 मार्च : आपल्याला सर्दी, खोकला किंवा कणकण जाणवत असेल तर आपण अँटिबायोटिक औषध घेतो. ते घेण्यापूर्वी आपण डॉक्टरांचा सल्ला घेतोच असं नाही. इन्फेक्शन सौम्य असेल तर मेडिकलमधून अँटिबायोटिक्स घेऊन त्याचं सेवन केलं जातं. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही सौम्य इन्फेक्शनवर उपचार म्हणून अँटिबायोटिक्सचं सेवन करू नये. यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. याबद्दल बेंगळुरूतील अॅस्टर सीएमआय हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसीन विषयाच्या सीनिअर कन्सल्टंट डॉ. बिंदुमती पी. एल. यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

  अँटिबायोटिक्स हे सर्वात सामान्य अँटिमायक्रोबायल सबस्टन्सेस आहेत, जे बॅक्टेरियाला मारून किंवा त्यांची वाढ रोखून त्यांच्याशी लढण्यासाठी वापरले जातात. पण नवनव्या टेक्नॉलॉजींमुळे आणि माहितीच्या सुलभ उपलब्धतेमुळे बरेच लोक आता सामान्यपणे ही औषधं योग्य प्रिस्क्रिप्शनशिवाय घेत आहेत. ज्यामुळे अँटिमायक्रोबायल रेझिस्टन्स आणि साइड इफेक्ट्सशी संबंधित प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.

  अँटिबायोटिक्सचा अतिवापर किंवा अनावश्यक वापर केल्याने काही गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्या खालीलप्रमाणे -

  गट फ्लोरातील असंतुलन : आतड्यात संतुलन राखण्यासाठी, योग्य पचन आणि रोगप्रतिकारशक्ती ठेवण्यात मदत करणारे जीवाणू बॅक्टेरिया गट फ्लोरा म्हणून ओळखले जातात. पण, अँटिबायोटिक्सचं अतिसेवन किंवा अतिवापर केल्याने आतड्यांमध्ये असंतुलन निर्माण होऊ शकतं आणि या महत्त्वपूर्ण बॅक्टेरियाचे प्रमाण कमी होऊ शकतं, ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

  डायरिया : बरेच लोक लहान मुलं आणि प्रौढांना झालेल्या सामान्य सर्दी किंवा फ्लूवर उपचार करण्यासाठी अँटिबायोटिक्सचा वापर करतात, पण यामुळे अनेकदा अनेक दुष्परिणाम होतात. सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शनच्या अभ्यासानुसार, ज्या लहान मुलांना कफ किंवा सर्दी यासारख्या श्वसन यंत्रणेतील इन्फेक्शनसाठी नियमितपणे अँटिबायोटिक्स दिलं जातं, अशा मुलांना बॅक्टेरियल अँटिबायोटिक रेझिस्टन्स स्ट्रेन यालाच C. diff असं म्हटलं जातं, या स्ट्रेनची लागण होण्याची शक्यता जास्त असते. आतड्यात इन्फेक्शन वाढलं तर गंभीर डायरियाही होऊ शकतो.

  या बॅक्टेरियामुळे दरवर्षी हजारो मुलं आणि प्रौढ लोकांचा मृत्यू होतो. अॅनाफिलेक्सिस, स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोम, हेपॅटोटॉक्सिसिटी, नेफ्रोटॉक्सिसिटी आणि एरिथमियासारखे घातक दुष्परिणामदेखील होऊ शकतात.

  फंगल इन्फेक्शन - अँटिबायोटिक्स हानीकारक जीवाणू मारण्यासाठी डिझाइन केलेले असले तरी, ते अनेकदा चांगले जीवाणू देखील मारतात, या जीवाणूंमुळे लोकांना फंगल इन्फेक्शनपासून संरक्षण मिळतं. यामुळे, जे लोक अँटिबायोटिक्सचं सेवन करतात त्यांना बहुतेकदा त्यांच्या शरीराच्या काही भागांमध्ये म्हणजेच तोंड, घसा आणि गुप्तांगामध्ये फंगल इन्फेक्शन होतं.

  ड्रग इंटरॅक्शन्स - अँटिबायोटिक्स काहीवेळा इतर औषधांशीदेखील इंटरॅक्ट करतात, यामुळे त्या औषधांचा प्रभाव कमी होतात. हा इंटरॅक्शनमुळे अँटिबायोटिक्स संबंधित रोगांवर कमी प्रभावी ठरतात. काही अँटिबायोटिक्स लिव्हर एन्झाईम्सवर परिणाम करतात, त्यामुळे कार्डिअ‍ॅक ड्रग्ज, अँटिपिलेप्टिक ड्रग्स आणि कम्बाईन ड्रग्जची क्षमता कमी होते किंवा वाढते.

  अँटिमायक्रोबायल रेझिस्टन्स 

  जेव्हा अँटिबायोटिक्सचा सतत वापर केला जातो तेव्हा बॅक्टेरिया त्यांची रचना बदलण्याचा किंवा विशिष्ट एन्झाईम सोडण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे रूग्णांवर पूर्वी उपचार करण्यासाठी वापरल्या गेलेल्या अँटिबायोटिक्सची प्रतिकारशक्ती विकसित होते. उदाहरणार्थ, पूर्वी टायफइड, ताप आणि श्वसन संक्रमणासाठी वापरले जायचे तेच अँटिबायोटिक्स आता त्याच रोगावर उपचार करण्यासाठी प्रभावी होणार नाहीत. उदा.- पूर्वी क्षयरोगासारख्या आजारांना 6 महिन्यांसाठी फक्त 3-4 औषधांची गरज भासत होती, परंतु आता प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याने दीड ते दोन वर्षांसाठी 9-11 औषधांची आवश्यकता असते.

  अँटिबायोटिक्स घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?

  1.अँटिबायोटिक्सचा डोस योग्य असल्यास तो जास्त प्रभावी ठरू शकतो आणि काही दिवसातच बरं वाटू शकतं. योग्य उपचारांसाठी स्वत:च औषधोपचार करण्याऐवजी हेल्थ केअर प्रोव्हायडरचा सल्ला घेणं योग्य ठरतं.

  2. सर्व इन्फेक्शन्सना अँटिबायोटिक्सची गरज नसते, काही सेल्फ लिमिटिंग असू शकतात. जसं की सौम्य सर्दी, खोकला किंवा ताप 1 किंवा 2 दिवस टिकतो आणि गरज नसल्यास कोणतेही अँटिबायोटिक्स घेऊ नये. साध्या डायरिया, पोटदुखी यासाठी अँटिबायोटिक्सची गरज नसते. बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यास गरज भासू शकते. डेंग्यू हादेखील एक विषाणूजन्य संसर्ग आहे ज्याला अँटिबायोटिक्सची आवश्यकता नसते. ताप आणि हायड्रेशन यासारख्या केवळ लक्षणात्मक उपचारांसाठी त्याची गरज असते.

  3.वृद्ध, इम्युनोसेप्रेशनवरील पेशंट व डायबेटिस रुग्ण आणि सामान्य लोकांनाही इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे अँटिबायोटिक्सचे हानिकारक दुष्परिणाम कमी करण्यासाठी असा सल्ला दिला जातो की ज्या लोकांना संसर्ग होण्याची शक्यता असते त्यांनी मास्क घालून, हातांची स्वच्छता ठेवून, हँड सॅनिटायझर वापरून स्वतःचे संरक्षण केले पाहिजे.

  4. लसीकरणामुळे इन्फेक्शन टाळता येतं.

  First published:
  top videos

   Tags: Health, Health Tips, Lifestyle