• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • होळी खेळताना 'ही' काळजी घ्यायला विसरू नका

होळी खेळताना 'ही' काळजी घ्यायला विसरू नका

पण उत्साहाचे रंग उधळत आलेल्या या रंगोत्सवात रंगून जाताना, रंगाचा बेरंग होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे

  • Share this:
  02 मार्च :  आज धुलिवंदन आहे. सर्वत्र होळीचा उत्साह असणार. पण उत्साहाचे रंग उधळत आलेल्या या रंगोत्सवात रंगून जाताना, रंगाचा बेरंग होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.  त्यासाठी काही खास टिप्स. होळी खेळताना या गोष्टी विसरू नका   1. रंग खेळण्यापूर्वी केस स्वच्छ धुवून, सुकवून घ्या आणि केसांना तेल लावायला विसरू नका 2. होळी खेळायला बाहेर पडताना सन क्रीम लावायला विसरू नका. नाहीतर त्वचा खराब होऊ शकत असते 3. केमिकल रंग तुमच्या त्वचेला हानिकारक ठरू शकतात त्यामुळे नैसर्गिक रंगांचाच वापर करा 4. कानांच्या मागे बोटांच्यामध्ये तेल लावायला विसरू नका. तसंच केसांची खोबरेल तेलाने मालिश करा. याने त्रास होणार नाही. 5 सिंथेटीक कपडे आज घालू नका. शक्यतो सुती कपडेच घाला. 6. होळी खेळल्यानंतर फेस वॉशचा आणि साबणाचा प्रमाणात वापर करून आंघोळ करा.
First published: