झोपण्याआधी मोबाईलचा वापर टाळा,नाहीतर...

झोपण्याआधी मोबाईलचा वापर टाळा,नाहीतर...

जेव्हा तुम्ही रात्री झोपण्यासाठी जाता तेव्हा प्रत्यक्ष झोपण्याऐवजी तुम्ही अनेकदा एखादा मेसेज पाहण्यासाठी म्हणून मोबाईल हातात घेतात. प

  • Share this:

जेव्हा तुम्ही रात्री झोपण्यासाठी जाता तेव्हा प्रत्यक्ष झोपण्याऐवजी तुम्ही अनेकदा एखादा मेसेज पाहण्यासाठी म्हणून मोबाईल हातात घेतात. पण त्यानंतर मात्र एक मेसेज किंवा एखादा व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणून हाती घेतलेला मोबाईल पुढचे 2-3 तास तुम्हाला सोडवत नाही. त्यावेळी तुमच्या हे लक्षात येत नाही की, 2 ते 3 तासाच्या झोपेला कात्री लावल्याने त्याचा तुमच्या आरोग्यावर घातक परिणाम होणार होत असतो.

अपुऱ्या झोपेचा स्मरणशक्तीवर होणारा परिणाम -

6-8 तासांची झोप पूर्ण न झाल्यास दुसऱ्या दिवशी डोकेदुखीचा त्रास होवू शकतो. तसंच याचा तुमच्या स्मरणशक्तीवरही परिणाम होतो.

पूर्ण दिवस लक्ष विचलित राहण्यामागेही अपुरी झोप हेच कारण -

झोप पूर्ण झाली नसेल तर त्याचा प्रभाव आपण दिवसभर करत असलेल्या कामावर होतो. त्या कामाकडे आपले लक्ष लागत नाही.

ही सवयदेखील बनू शकते

जर तुम्ही सततच पूर्ण झोप घेवू शकत नसाल तर नंतर ही सवयच बनून जाते. यामुळे शरीरातील न्यूरोटॉक्सीनचे प्रमाण वाढते, ज्यातून झोप न लागण्याची समस्या निर्माण होते.

तणावामुळे झोप कमी होवू शकते  

कमी झोपेमुळे शरीरात मेलाटोनिनचेही प्रमाण वाढते, जे तणाव वाढण्याचे कारण ठरते.

वजनवाढीला आमंत्रण

अनेकदा अपुरी झोप हेच वजनवाढ होण्यामागील कारण असल्याचे दिसून येते.

हे आहेत अपुऱ्या झोपेचे दुष्परिणाम. मग या अपुऱ्या झोपेला कारणीभूत ठरणाऱ्या झोपेअगोदरच्या मोबाईल वापराला कधी बाय बाय करताय..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2017 10:07 PM IST

ताज्या बातम्या