मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

प्रथिनांच्या कमतरतेमुळं विविध आजारांना मिळतं आमंत्रण; म्हणून या पदार्थांचा आहारात करा समावेश

प्रथिनांच्या कमतरतेमुळं विविध आजारांना मिळतं आमंत्रण; म्हणून या पदार्थांचा आहारात करा समावेश

आपल्या हाडांना बळकटी देण्याबरोबरच ते रक्ताचे कार्य योग्य ठेवते. या व्यतिरिक्त प्रथिने आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. जर शरीरात प्रथिनांची कमतरता असेल तर अनेक रोग होण्याची शक्यता वाढते.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर : शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रथिनं (Protein) खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळेच वैद्यकीय तज्ज्ञ उच्च प्रथिनेयुक्त आहार घेण्याची शिफारस करतात. शरीरातील स्नायूंच्या निर्मितीसाठी प्रथिने एक आवश्यक घटक आहे. प्रथिने हा ऑक्सिजन, नायट्रोजन आणि हायड्रोजनचा बनलेला घटक आहे. प्रथिनं धान्य, दुधाचे पदार्थ, मांस, मासे, बदाम, हिरव्या भाज्या आणि इतर अन्नपदार्थांमध्ये (High Protein Diet) आढळतात. आपल्या हाडांना बळकटी देण्याबरोबरच ते रक्ताचे कार्य योग्य ठेवते. या व्यतिरिक्त प्रथिने आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. जर शरीरात प्रथिनांची कमतरता असेल तर अनेक रोग होण्याची शक्यता वाढते.

आपल्या घरात उपलब्ध असलेल्या खाद्य पदार्थांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. यापैकी बरेच पदार्थ अनेकांच्या घरात सहज उपलब्ध आहेत. त्यांचा आपल्या आहारात समावेश केल्याने केवळ शरीर निरोगी ठेवता येत नाही, तर प्रथिनांच्या कमतरतेवरही मात करता येते.

1. दुग्धजन्य पदार्थ - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. दूध, पनीर, मावा, चीज, बटरमध्ये केवळ प्रथिनेच नाहीत तर जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम देखील पुरेशा प्रमाणात असतात.

हे वाचा - Aryan Khanच्या अटकेनंतर शाहरुख खानचं कोट्यवधींचं नुकसान, या कंपनीने थांबवल्या सर्व जाहिराती

2. सुका मेवा (ड्राय फ्रूट्स) - सुका मेवा अर्थात ड्राय फ्रूट्समध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, पोटॅशियम आणि सोडियम भरपूर प्रमाणात असतात. निरोगी राहण्यासाठी दररोज मर्यादित प्रमाणात सुकामेवा खावा. हे प्रोटीनची कमतरता दूर करते.

3. किवी - किवी हे असं एक फळ आहे जे इतर फळांच्या तुलनेत थोडं महाग आहे. पण ते व्हिटॅमिन सी आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. त्याचे सेवन केल्याने शरीरात पुरेशा प्रमाणात प्रथिने पोहचतात.

हे वाचा - नवाब मलिकांच्या आरोपावर NCB चं स्पष्टीकरण, तीन नाहीतर 6 जणांना पुराव्या अभावी दिलं सोडून

4. मूग डाळ - प्रथिने बहुतेक डाळींमध्ये आढळतात, मात्र मूग डाळ प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. मुगाची डाळ शरीरासाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर आहे. अशा परिस्थितीत, डाळी प्रथिनांचे चांगले स्त्रोत म्हणून देखील वापरले जाऊ शकतात.

5. बदाम - बदामामध्ये भरपूर प्रथिने असतात. हिवाळ्यात बदामाचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले मानले जाते. दररोज बदाम मर्यादित प्रमाणात खाल्ल्याने प्रथिनांची कमतरता पूर्ण होते, तसेच हिवाळ्यात शरीर उबदार राखण्यासाठी उपयुक्त ठरते.

First published:

Tags: Health, Health Tips