Home /News /lifestyle /

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी या' 4 गोष्टी ठेवा लक्षात!

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी या' 4 गोष्टी ठेवा लक्षात!

मान्सून कधीच एकटा येत नाही, तो सोबत संसर्ग आणि ऍलर्जीसारख्या समस्या (infections and allergies ) घेऊन येतो. यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

    नवी मुंबई, 16 जून : यंदाच्या उन्हाळ्यानं (Summer) तर सर्व रेकाॅर्ड ब्रेक करत उच्चांक गाठला.  या वर्षी रखरखत्या उन्हाळ्यात नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. उष्णतेपासून दिलासा मिळावा म्हणून नागरिक पावसाच्या आगमनाची वाट पाहत आहेत. अशातच पावसाच्या हंगामाला सुरुवातही (Rainy Season Latest Update) झाली आहे. काही ठिकाणी पावसाच्या आगमनामुळे नागरिक सुखावले आहेत. मात्र निरोगी राहण्यासाठी पावसाळ्यात काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे (Be careful in the rainy season). मान्सून कधीच एकटा येत नाही, तो सोबत संसर्ग आणि ऍलर्जीसारख्या समस्या (infections and allergies ) घेऊन येतो. यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हे ही वाचा -  Anxiety Relief: ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा निरोगी आहार -  पावसाळ्यातील अनेक समस्यांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही सकस आहार घेणं गरजेचं आहे. यासाठी ताजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, शेंगा आणि कडधान्यांचा आहारात समावेश करा. तसेच मसालेदार, तेलकट, जंक, रस्त्यावरील आणि पॅकबंद खाद्यपदार्थांबरोबरच दारू आणि धूम्रपानापासून दूर राहणे आवश्यक आहे. हे ही वाचा -  Yoga series Episode - 1 : योगासने करण्यापूर्वी warm up exercise कसा कराल, पहा VIDEO व्यायाम -  दररोज काही वेळ व्यायाम करणे आवश्यक आहे. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल. यामुळे तुमचे रक्ताभिसरण बरोबर होईल, तसेच हृदयही चांगले काम करेल. संक्रमण, ऍलर्जी आणि रोगांपासून स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम होण्यासाठी मदत होईल. शरिराला हाडड्रेट ठेवा -  पावसाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्याचीही गरज असते. यासाठी पुरेसे पाणी प्या, जेणेकरून तुमच्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडू शकतील. पाण्याशिवाय तुम्ही आल्याचा चहा, ग्रीन टी किंवा कॅमोमाइल चहाचीही मदत घेऊ शकता. गरम पाणी -  ऑफिसमधून किंवा शाळा-कॉलेजवरून आल्यावर आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर केल्यास उत्तम. यामुळे तुम्ही इन्फेक्शन आणि अॅलर्जीपासून बर्‍याच प्रमाणात दूर राहू शकाल, ज्यामुळे तुमचा आजारी पडण्याचा धोका खूप कमी होईल.
    Published by:Sayali Zarad
    First published:

    Tags: Health, Health Tips, Rain

    पुढील बातम्या