नवी दिल्ली, 15 मे : भारतातील अनेक शहरांचे तापमान 47 ते 48 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. प्रचंड उष्णता, उन्हाचा कडाका यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर उष्माघाताचा धोका निर्माण होतो. या हंगामात गरम वारे आणि थेट सूर्यप्रकाश टाळणे फार महत्त्वाचे आहे.
उन्हात बाहेर जावंच लागत असेल तर -
नोकरदार लोकांसाठी उन्हात बाहेर पडणं ही मजबुरी आहे, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने या उन्हाचा प्रभाव तर कमी होऊ शकतोच, पण उष्माघात, डिहायड्रेशन सारख्या गोष्टींचाही त्रास जाणवणार नाही.
कडक उन्हात बाहेर पडताना काय करावे -
1. शरीर हायड्रेटेड ठेवा
जेव्हाही उन्हात किंवा कडक उन्हात घराबाहेर पडता तेव्हा शरीरात कोणत्याही प्रकारे पाण्याची कमतरता भासू नये याची काळजी घ्या. थेट सूर्यप्रकाशात जाण्यापूर्वी भरपूर पाणी पिणे चांगले. याशिवाय ठराविक अंतराने द्रवपदार्थांचे सेवन करत राहा. तुम्ही नारळ पाणी, लिंबूपाणी, ताज्या फळांचा रस देखील पिऊ शकता.
2. योग्य कपडे घालणे -
कित्येकदा आपण इतके फॅशन फ्रिक बनतो की कडक उन्हातही आपण चुकीच्या पद्धतीचे कपडे घालून बाहेर पडतो. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला जास्तीत जास्त आराम देतील, असे कपडेच वापरा. या ऋतूत हलक्या रंगाचे कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यामुळे सूर्यप्रकाश परावर्तित होण्यास मदत होते, तर गडद रंगाचे कपडे उष्णता शोषून घेतात. फक्त हलक्या रंगाचे सुती आणि सैल फिटिंगचे कपडे घाला.
हे वाचा- केसांच्या सगळ्या समस्यांवर एकमेव जालीम उपाय; काळे हरभरे अशा पद्धतीनं वापरून बघा
3. सनबर्न टाळा -
सनबर्न किंवा स्किन टॅनिंगचा परिणाम त्वचेवर जास्त दिसत असेल तर तुम्ही यासाठी सनस्क्रीन लावू शकता. उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीन लावायलाच हवे. याशिवाय स्कूटी चालवताना कोपरापर्यंत हातमोजे घाला आणि चेहरा सुती कापडाने किंवा सुती दुपट्ट्याने झाका. जर तुम्ही चालत असाल तर तुम्ही रुंद टोपी देखील घालू शकता.
हे वाचा - आंबा खाल्ल्यानं वजन कमी होतं का? एका दिवसात नेमके किती आंबे खाणे आहे योग्य
4. काळा चष्मा घाला -
कडक उन्हाचा आणि प्रखर सूर्यप्रकाशाचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो, त्यामुळे डोळ्यांना चांगल्या प्रतीचे सनग्लासेस लावणे गरजेचे आहे जेणेकरून तुमचे डोळे सुरक्षित राहतील. अनेक वेळा, पैसे वाचवण्यासाठी, आपण कमी दर्जाचे काळे चष्मे विकत घेतो, जे डोळ्यांचे संरक्षण करू शकत नाहीत.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Summer, Summer season