घरातील लहान मुलांना असेल दम्याचा त्रास तर अशी घ्या काळजी, या गोष्टी ठेवा घरापासून दूर
घरातील लहान मुलांना असेल दम्याचा त्रास तर अशी घ्या काळजी, या गोष्टी ठेवा घरापासून दूर
तज्ज्ञांच्या मते मुलांमध्ये दम्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. परंतु कुटुंबातील एखाद्याला दमा असल्यास किंवा आईने गरोदरपणात धूम्रपान केल्यास लहान मुलांमध्ये दमा होण्याचा धोका वाढतो.
मुंबई, 6 जुलै : दम्याचा (Asthma) आजार केवळ पौढ व्यक्तींमध्ये असतो असे नाही. हा आजार आता लहान मुलांमध्ये (Asthma in children) देखील आढळत आहे. दम्यामुळे (Dama) अनेकदा मुलांना श्वास घेण्यास किंवा बोलण्यात त्रास होतो. लहान मुले आणि अर्भकांचे वायुमार्ग (श्वासाच्या नळ्या) प्रौढांच्या तुलनेत खूपच लहान असतात. यामुळे लहान मुलांमध्ये श्वासोच्छवासाचा (Breathing Problem) गंभीर त्रास होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते मुलांमध्ये दम्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. परंतु कुटुंबातील एखाद्याला दमा असल्यास किंवा आईने गरोदरपणात धूम्रपान केल्यास लहान मुलांमध्ये दमा होण्याचा धोका वाढतो. तसेच पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये दम्याचे कारण रेस्पिरेटरी वायरस (Respiratory viruses) देखील असू शकते.
लहान मुलांची समस्या नेमकी काय आहे हे शोधणे थोडे कठीण असते. कारण तो स्वत: बोलू शकत नाही. त्यामुळे त्याची समस्या अचूकपणे लक्षात येत नाही. परंतु बाळामध्ये अस्थमाच्या लक्षणांबद्दल पालकांनी जागरूक असले आवश्यक असते. अशा स्थितीत तुमच्या मुलाला देखील दमा तर नाही नाही हे जाणून घेणे आणि त्यासाठी अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे असते. एखाद्या मुलाला दम्याचा अटॅक येतो तेव्हा खोकला सुरूच राहतो. तुमच्या मुलाला खोकला आणि श्वास घ्यायला किंवा बोलायला त्रास तर होत नाही ना हे पाहणे तुमच्यासाठी खूप कठीण आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की दमा असलेल्या मुलास अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे.
घरात येणारी धुळ टाळा
डॉक्टर संदीप नय्यर यानी herzindagi ला दिलेल्या माहितीनुसार दम्यामध्ये धूळ ट्रिगर म्हणून काम करते. त्यामुळे घरात कमीत कमी धूळ आणि माती असेल याची काळजी घ्यावी आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. घरातील कार्पेट एरियाही कमीत कमी ठेवा. यामध्ये धूळ तर जमा होतेच शिवाय माइट्समुळे मुलाचा दमाही वाढू शकतो.
घरात येणारा ओलसरपणा टाळा
सध्या पावसाळा सुरु झाला आहे. या ऋतूत घरांमध्ये ओलसरपणा येणे सामान्य समस्या आहे. परंतु तुमच्या घरात दम्याचा त्रास असणारे मूल असेल तर घराच्या भिंतींवर ओलसरपणा येणार नाही याची काळजी घ्यावी. ओलाव्यामध्ये बुरशी असते आणि त्यामुळे मुलामध्ये दम्याचा त्रास होण्याची समस्या वाढू शकते.
Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणामघरात पाळीव प्राणी ठेवू नका
काही लोकांना घरात कुत्रा किंवा मांजर सारखे पाळीव प्राणी पाळणे आवडते. परंतु तुमच्या मुलाला दमा असेल तर घरात पाळीव प्राणी ठेवणे टाळा. घरांमध्ये पाळीव प्राणी असल्यास जागोजागी त्यांचे केस पडू शकतात त्यामुळे मुलाला त्रास होऊ शकतो. याशिवाय मुलांना त्यांच्यासोबत खेळायलाही आवडते, परंतु पाळीव प्राण्यांची केस ऍलर्जीक असतात. त्यामुळे दम्याचा त्रास वाढू शकतो.
Published by:Pooja Jagtap
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.