सावधान! गाडीत पेट्रोल-डिझेल भरताना 'ही' काळजी घ्या!

सावधान! गाडीत पेट्रोल-डिझेल भरताना 'ही' काळजी घ्या!

गाडीमध्ये इंधन भरताना पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांसह गाडीचालक आणि सोबतच्या लोकांनीही काळजी घ्यायला हवी.

  • Share this:

दररोज वाहनाने प्रवास करणाऱ्या लोकांना पेट्रोल पंपावर घ्यावी लागणारी काळजी सांगण्याची गरज नाही. तरीही आपण नेहमी जातो असं म्हणत काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. पेट्रोल-डिझेल हे ज्वलनशील पदार्थ आहेत आणि आग लागलीच ते कमी वेळेत भडका उडतो. त्यामुळे पंपावर ज्वलनशील पदार्थ नेणं टाळावं किंवा त्यांचा वापर करू नये. सोशल मीडियावर पेट्रोल भरताना आग लागलेले अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातून काहीजण धडा घेतात तर काही त्याकडं दुर्लक्ष करतात. पण असं करणं धोकादायक ठरू शकतं.

गाडीमध्ये इंधन भरताना पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांसह गाडीचालक आणि सोबतच्या लोकांनीही काळजी घ्यायला हवी. काही नियम आणि गोष्टी लक्षात ठेवल्या तर होणाऱ्या दुर्घटना टाळता येतात. खरंतर यासाठी सुचना फलक पंपावर लावलेले असतात पण त्याकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही.

तेल भरत असताना गाडीचे इंजिन बंद करा. पेट्रोल भरत असताना गाडी गरम झाली असेल तर अशा वेळी आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे गाडी बंद करणं केव्हाही सुरक्षेसाठी चांगलं असतं.

पेट्रोल पंपाच्या परिसरात धूम्रपान करू नये. तसेच कोणत्याही प्रकारचा ज्वलनशील पदार्थ घेऊन जाऊ नये. याठिकाणी एक लहानशी ठिणगीसुद्धा मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकते.

सध्या जवळपास प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. सतत कानाला मोबाईल लावलेला असतो. पेट्रोल पंपाच्या परिसरात मोबाईलवर बोलणं टाळावं. यामधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे आग लागण्याची शक्यता आहे. प्लास्टिक किंवा काचेच्या बाटलीमधून पेट्रोल-डिझेल नेणं धोकादायक असतं. असा धोका पत्करू नये.

पंपावर तेल टाकताना होणाऱ्या फसवणुकीपासूनही सावध रहा. तुम्ही तेल टाकताना मीटर शून्य केलं आहे की नाही ते चेक करा. तसंच पैसे दिल्यानंतर ते नीट तपासून घ्या. अनेकदा गडबडीत तुम्ही तसेच निघून जाता. यात तुम्हाला कमी-जास्त पैसे दिले जाण्याची शक्यता असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 5, 2020 08:11 AM IST

ताज्या बातम्या