Home /News /lifestyle /

शेतकरी आंदोलनातही माझ्या बिकिनी फोटोची चर्चा; ‘तारक मेहता...’ मधील सोनूनं व्यक्त केला संताप

शेतकरी आंदोलनातही माझ्या बिकिनी फोटोची चर्चा; ‘तारक मेहता...’ मधील सोनूनं व्यक्त केला संताप

देशात शेतकरी आंदोलन (Farmer protest) सुरू असताना तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) सोनूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निधी भानुशालीचे (Nidhi Bhanushali) बिकिनी फोटो (Bikini Photos) ट्रेंड होऊ लागले. त्यावर तिनं आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 डिसेंबर : देशभरात सध्या शेतकरी आंदोलनाचा  (Farmer protest) मुद्दा गाजतो आहे. मात्र अशा परिस्थितीतही तारक मेहता का उल्टा चश्मामधील (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)  भिडे भाईच्या सोनूची भूमिका निभावणारी अभिनेत्री निधी भानुशालीचे (Nidhi Bhanushali)  बिकिनी (Bikini Photos)  फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. शेतकरी आंदोलनातही आपले बिकनी फोटो ट्रेंड होत असल्याचं पाहताता निधी चांगलीच भडकली आहे. निधी भानुशालीनं गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्रामवर आपले बिकनी फोटोज पोस्ट केले होते. देशात शेतकरी आंदोलन सुरू असतानादेखील लोक तिच्या या फोटोची चर्चा करत आहेत. त्यामुळे निधीनं संताप व्यक्त केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत निधी म्हणाली, हे माझं आयुष्य आहे आणि इतर लोकांप्रमाणे मीदेखील माझ्या आयुष्यातील काही क्षण माझ्या सोशल मीडियावर शेअर करते. मी ट्रेंड करू लागले याचंचं मला आश्चर्य वाटतं आहे. कारण देशात इतकं सर्वकाही होतं आहे आणि त्यामध्येही लोक माझे बिकिनी फोटोज पाहत आहेत आणि त्यावर चर्चा करण्यासाठी त्यांना वेळ मिळतो आहे. मी माझ्या मित्रमैत्रिणींशीदेखील याबाबत बोलले. तेव्हा त्यांनादेखील हे थोडं विचित्र आणि हास्यस्पद वाटलं. मला तर खूपच राग येतो आहे. कदाचित माझे तसे फोटो पाहून लोकांना धक्का बसला असावा, मात्र मला कुणालाही असा कुणालाही धक्का देण्याचा उद्देश नव्हता. मी कोणत्याही न्यूजला फॉलो करत नाही, त्यामुळे मला सोशल मीडियावर असे पोस्ट येत नाही. जेव्हा मला माझ्या नातेवाईकांनी, मित्रमैत्रिणींनी अशा बातम्यांची लिंक पाठवली तेव्हा माझं याकडे लक्ष केलं. मला आश्चर्य वाटतं की देशात शेतकरी आंदोलन सुरू आहे आणि लोक माझ्या बिकिनी फोटोवर चर्चा करत आहेत. निधी सध्या तारक मेहतामध्ये काम करत नाही. ती फिल्ममेकिंगचं शिक्षण घेते आहे आणि तिला सिनेमा क्षेत्रातच करिअर बनवायचं असल्याचंही तिनं सांगितलं.
    First published:

    Tags: Tarak mehta ka ooltah chashmah

    पुढील बातम्या