मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Tongue Cancer : तोंडातील व्रण, फोडांकडे दुर्लक्ष नका करू; जीभेच्या कर्करोगाची असू शकतात लक्षणं

Tongue Cancer : तोंडातील व्रण, फोडांकडे दुर्लक्ष नका करू; जीभेच्या कर्करोगाची असू शकतात लक्षणं

जिभेचा कर्करोग (Tongue Cancer) धूम्रपान, तंबाखू सेवन, अल्कोहोल सेवन यासारख्या अनेक कारणांमुळे होऊ शकतो. तीक्ष्ण दातांमुळे अल्सर आणि लोहाची कमतरता देखील जीभेच्या कर्करोगाचे कारण बनू शकते.

जिभेचा कर्करोग (Tongue Cancer) धूम्रपान, तंबाखू सेवन, अल्कोहोल सेवन यासारख्या अनेक कारणांमुळे होऊ शकतो. तीक्ष्ण दातांमुळे अल्सर आणि लोहाची कमतरता देखील जीभेच्या कर्करोगाचे कारण बनू शकते.

जिभेचा कर्करोग (Tongue Cancer) धूम्रपान, तंबाखू सेवन, अल्कोहोल सेवन यासारख्या अनेक कारणांमुळे होऊ शकतो. तीक्ष्ण दातांमुळे अल्सर आणि लोहाची कमतरता देखील जीभेच्या कर्करोगाचे कारण बनू शकते.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 25 मार्च : जीभेचा कर्करोग हा तोंडाच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये जिभेच्या पेशींमध्ये ट्यूमर किंवा जखम तयार होऊ लागतात. जिभेचा कर्करोग (Tongue Cancer) धूम्रपान, तंबाखू सेवन, अल्कोहोल सेवन यासारख्या अनेक कारणांमुळे होऊ शकतो. तीक्ष्ण दातांमुळे अल्सर आणि लोहाची कमतरता देखील जीभेच्या कर्करोगाचे कारण बनू शकते. दुसरीकडे, जर त्यावर योग्य वेळी उपचार केले गेले नाहीत तर रुग्णांना त्यांची संपूर्ण जीभ गमवावी लागते आणि काहीवेळा तो शरीराच्या इतर भागांमध्ये देखील पसरू शकतो. जीभेच्या कर्करोगाची प्रकरणे TheHealthSite.com च्या बातमीनुसार, मुंबईच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये जिभेच्या कर्करोगाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी 5 ते 6 गंभीर प्रकरणेही होती. ओन्को सर्जन आणि सल्लागार ओटोरहिनोलरींगोलॉजिस्ट डॉ.चंद्रवीर सिंग यांनी सांगितले की, अलीकडेच 24 वर्षीय महिलेला आयव्हीए स्टेजचा जीभेचा कर्करोग झाला आहे. ज्यावर जटिल शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी आणि केमोथेरपीद्वारे उपचार केले गेले आहेत. अशी लक्षणे दिसू शकतात रेश्मा शहा (नाव बदलले आहे) एका कंपनीत कार्यक्रम व्यवस्थापक (इव्हेंट मॅनेजर) आहे. डॉक्टरांच्या मते, जिभेच्या उजव्या बाजूच्या कडेला तिच्या तोंडात 4.5 सेमी व्रण होते. यामुळे तिला ना जेवता येत होते ना बोलता येत होते. रेश्माचे भयंकर तोंड दुखत होते आणि गिळतानाही त्रास होत होता. तिला 4 महिन्यांपेक्षा जास्त काळ ही लक्षणे होती. हे वाचा - दूध पिण्याच्याबाबतीत अशी चूक बरेचजण करतात; या वेळात प्यायल्यानं अनेक त्रास होतात रेश्माने सांगितले की, जेव्हा ती लॉकडाऊन दरम्यान घरून काम करत होती, तेव्हा तिच्या लक्षात आले की ती तोंडात व्रण असल्याने ती तिकट आणि मसालेदार अन्न खाऊ शकत नाही. तिनं खूप फिकट अन्न खाण्यास सुरुवात केली, परंतु त्रास संपला नाही आणि वाढतच गेला. काही दिवसांनी तिला तोंड दुखणे, बोलणे आणि जेवताना काहीही गिळताना त्रास जाणवू लागला. घरगुती उपचारांचा काहीही परिणाम होत नाही - निदान होण्यापूर्वी, बहुतेक रुग्णांसोबत असे घडते की, ते घरगुती उपचारांचा अवलंब करतात. लोक यासाठी अल्सरवर मध, कोरफडीचा रस सारख्या गोष्टी लावायला लागतात, पण रेश्माने स्वतः सांगितले की तिला यातून काहीच आराम मिळाला नाही. हळूहळू त्रास वाढत गेला आणि रोजची कामं करणंही तिला अवघड होऊ लागलं. त्यानंतर ती वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये गेली आणि तिचे उपचार सुरू झाले. उपचारानंतर, आता रेश्मा आरामात घन पदार्थ खाऊ शकते आणि तिच्या बोलण्याची गुणवत्ता देखील सुधारली आहे. आता ती गाऊसुद्धा शकते. डॉक्टरांच्या मते, अल्सर किंवा तोंडदुखीच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. हे वाचा - स्वयंपाक करताना कोणत्या धातूची भांडी वापरावीत? अनेकांची यात गफलत होते या सवयी टाळा डॉ. चंद्रवीर सिंह यांच्या मते, तंबाखू चघळणे, धूम्रपान करणे आणि अल्कोहोल सेवन केल्याने जीभेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. यासह तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. कधीकधी तीक्ष्ण दात अल्सरचे कारण बनू शकतात. यासाठी आपण आपल्या दंतवैद्याचा सल्ला घ्यावा.
First published:

Tags: Cancer, Health

पुढील बातम्या