वेळीच व्हा सावध, या आजाराची लक्षणं कळत नाहीत आणि अचानक होतो मृत्यू

वेळीच व्हा सावध, या आजाराची लक्षणं कळत नाहीत आणि अचानक होतो मृत्यू

या आजाराने भारतात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. या आजाराची सर्वात भयानक गोष्ट कोणती असेल तर याची लक्षणं दिसून येत नाही.

  • Share this:

Hepatitis B या आजाराने भारतात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. या आजाराची सर्वात भयानक गोष्ट कोणती असेल तर याची लक्षणं दिसून येत नाही.  Hepatitis B हा एक वायरल इन्फेक्शनचा आजाह आहे जो थेट यकृतावर परिणाम करतो. या आजारामुळे यकृताला सूज येते. विकसिनशील देशांमध्ये Hepatitis B हा आजार एक गंभीर समस्या आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, बांग्लादेश, भूटान, नेपाळ आणि थायलंड या देशांनी Hepatitis B आजारावर नियंत्रण मिळवलं आहे. पण भारतात मात्र हा आजार थांबायचं नाव घेत नाही. देशात दरवर्षी या आजाराने जवळपास लाखो लोकांचा मृत्यू होत आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी 1982 पासून लसीकरण सुरू करण्यात आलं. या लसीकरणामुळे 95 टक्के Hepatitis B या आजाराचा धोका कमी होतो.

Hepatitis B ची लक्षणं पटकन कळून येत नाहीत. या आजाराच्या सुरुवातीला थकवा, भूक न लागणे, उलटी, पोट दुखी, डोकं दुखणं, डोळ्यात पिवळसरपणा येणं अशी लक्षणं दिसतात. या आजाराचा सर्वात मोठा फटका यकृताला बसतो. काहींचं यकृत काम करणं पूर्ण बंद होतं, ज्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. Hepatitis B हा एक संसर्गजन्य रोग आहे. याचे वायरस संक्रमित रोगाच्या संपर्कात येऊन पसरतात. या आजाराचे वायरस फार शक्तीशाली असून सहजासहजी मरत नाहीत. या आजाराचे वायरस शरीराच्या बाहेर राहूनही अनेक महिने जीवंत राहू शकतात.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

Iron च्या कमतरतेमुळे होऊ शकता हा आजार, दुर्लक्ष केलं तर जाऊ शकतो जीव!

Loading...

नियमितपणे करताय व्यायाम तर चुकूनही करू नका डाएटिंग, शरीराचं होईल मोठं नुकसान

Vastushastra: घराला द्या हा रंग, नेहमीच नांदेल सुख-शांती आणि समाधान!

एका काजूत आहेत तुमच्या अनेक आजारांवरचे रामबाण उपाय, एकदा वाचाच!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 01:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...