हार्ट अटॅकच्या 'या' 5 लक्षणांबद्दल तुम्हाला माहिती हवीच

हार्ट अटॅकच्या 'या' 5 लक्षणांबद्दल तुम्हाला माहिती हवीच

लाईफस्टाइल कितीही चांगली असली तरीही आजकाल कुठल्याही वयात हार्ट अ‍टॅक येऊ शकतो.

  • Share this:

हृदयरोग कोणालाही होऊ शकतो. तुम्ही कितीही फिट दिसत असाल तरीही. काही लक्षणं अशी असतात ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण त्यामुळेच नंतर आपलं आरोग्य बिघडतं. आरोग्याबद्दलच्या काही गैरसमजुती असतात. लाईफस्टाइल कितीही चांगली असली तरीही आजकाल कुठल्याही वयात हार्ट अ‍टॅक येऊ शकतो.

रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर ही समस्या सायलेंट किलर आहे. म्हणून तुम्ही कितीही फिट असाल तरी वारंवार तुमचा रक्तदाब चेक करा. रक्तदाबामुळे तुम्हाला हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि किडनीशी संबंधित आजार होऊ शकतात. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमचे हार्टबिट्स जोरात चालतात. पण व्यायाम न करता हार्टबिट्समध्ये काही गडबड आढळली तर लगेच डाॅक्टरांकडे जा.

हार्ट अटॅक येण्याचं लक्षण दिसलं तर लगेच आडवे झोपा. डाॅक्टरांना फोन करा. तुमच्या छातीत दुखत नसेल तर समजा हार्ट अटॅक नाही. पण श्वास नीट घेता येत नाहीय, खूप घाम येतोय, हलकं डोकंही दुखतंय, असं काही झालं तर डाॅक्टरांकडेच धाव घ्या.

अनेकदा छातीत दुखतं. तेव्हा वाटतं हार्ट अटॅक येणार. पण दर वेळी तसं नसतं. छातीत बाजूला दुखत असेल तर तो हार्ट अटॅक नाही. स्त्री आणि पुरुषांमध्ये एकाच प्रकारे हार्ट अटॅक येतो. लक्षणं सारखीच असतात.

जे लोक दारू पित नाहीत, पण रेड वाईन पितात त्यांना हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी असतो, असं अजिबात नाही. रेड वाईनही तितकीच धोकादायक. हार्ट अटॅक आल्यावरही पार्कात जाऊन चालण्याचा व्यायाम करता येतो. आनंदी राहता येतं.

VIDEO : VIDEO: ट्रॅफिक पोलिसांनी पावती फाडताच तरुणाने पेटवली बाईक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 06:32 PM IST

ताज्या बातम्या