शरीरात अशा पद्धतीचे बदल घडत असतील तर वेळीच व्हा सावध, होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर

शरीरात अशा पद्धतीचे बदल घडत असतील तर वेळीच व्हा सावध, होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर

आपल्या दुर्लक्ष करण्यामुळे एक दिवस कर्करोगासारखा गंभीर आजार होऊ शकतो हे विसरू नका. शरीराबद्दल अजिबात निष्काळजी राहू नका.

  • Share this:

आपल्या शरीरात सतत बदल घडत असतात. पण या बदलांकडे नैसर्गिक बदल म्हणून आपण नजर अंदाज करतो. मात्र यामुळे सर्वाधिक कोणाचं नुकसान होत असेल तर ते आपलंच असतं. आपल्या दुर्लक्ष करण्यामुळे एक दिवस कर्करोगासारखा गंभीर आजार होऊ शकतो हे विसरू नका. शरीराबद्दल अजिबात निष्काळजी राहू नका. पण महिलाच यात अग्रणी असतात. एखादा गंभीर आजार झाल्यावरच त्यांना शरीराची आणि आरोग्याची काळजी घेणं किती आवश्यक आहे ते कळतं.

आज आपण महिलांशी निगडीत धोकादायक आजार आणि रोगांबद्दल सांगणार आहोत. तसं पाहिलं गेलं तर कर्करोग हा एक मुळतः गंभीर आजार आहे. स्तनात स्तन पेशींच्या अनियंत्रीत वाढीमुळे कर्करोगासारखा आजार होतो. सतत होणाऱ्या पेशींच्या वाढीचं रुपांतर गाठीत होतं, ज्याला कॅन्सर ट्यूमर असं म्हटलं जातं.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार-

मोठ्या वयात पहिलं मूल होणं

बाळाला स्तनपान न करणं

वजन वाढणं

मद्यपान करणं

अनियंत्रित जीवनशैली

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणं-

स्तनाच्या आकारात बदल दिसून येणं

स्तन किंवा काखेच्या खाली गाठीसारखं जाणवणं

स्तन दाबल्यास दुखणं

स्तनातून एक चिकट द्रव बाहेर येणं

स्तनांच्या पुढचा भाग फिरणं किंवा त्याचा रंग लाल होणं

स्तनांना सूज येणं

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

स्पीकरने संसदेतच मुलाला पाजले दूध, PHOTO VIRAL

Wheat Grass खा आणि अनेक आजारांपासून करा स्वतःचं रक्षण

काम करताना तुम्हालाही गाणी ऐकायची सवय आहे का, तर जाणून घ्या या गोष्टी

वायरल तापापासून वाचण्यासाठी हे घरगुती उपाय करा, मिळेल लगेच आराम

मुलाच्या अंगावरून गाडी गेली पण खरचटलंही नाही, श्वास रोखून धरायला लावणारा VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 06:23 PM IST

ताज्या बातम्या