कामासाठी आणि राहण्याबाबत भारताचं स्थान घसरलं; हा देश आहे अव्वल!

कामासाठी आणि राहण्याबाबत भारताचं स्थान घसरलं; हा देश आहे अव्वल!

रहायला आणि काम करण्यासाठी सर्वोत्तम अशा देशांमध्ये 33 देशांचा समावेश करण्यात आला आहे.

  • Share this:

अनेकांना उच्च शिक्षण घेतल्यानंतर भारता बाहेर जाऊन राहायची आणि परदेशात काम करण्याची इच्छा असते. काहीजण यासाठी प्रयत्न करतात आणि आवश्यक त्या सर्व परीक्षा देऊन परदेशात नोकरी करायला जातात. कालांतराने तिथेच स्थायीकही होतात. राहायला आणि काम करणाऱ्या टॉप 10 देशांची यादी आता समोर आली आहे. या टॉप 10 देशांमध्ये भारताचं नाव नाही. या यादीत भारत 18 व्या स्थानावर आहे.

राहायला आणि काम करायला योग्य अशा देशांमध्ये भारताचा 18 वा नंबर आहे. विशेष म्हणजे याआधी याच यादीत भारताचा 12 वा नंबर होता. पण आता 6 नंबर मागे पडत 18 व्या स्थानावर भारताला समाधान मानावं लागत आहे. मात्र आयुष्यभराचे मित्र करायचे असतील तर भारत या यादीत अग्रणी आहे. तर करिअरमध्ये ठरवलेली गोष्ट पूर्ण करण्यात भारताचा जगात सहावा नंबर आहे.

एचएसबीसीने केलेल्या या सर्वेत हे स्पष्ट झालं आहे की, संपूर्ण आयुष्य एका देशात घालवण्यात भारत चौथ्या स्थानावर आहे. तसेच रहायला आणि काम करण्यासाठी सर्वोत्तम अशा देशांमध्ये 33 देशांचा समावेश करण्यात आला आहे.

जगात रहायला आणि काम करायला स्वित्झर्लंडला सर्वोत्तम देश सांगण्यात आलं आहे. इथे राहणारी 80 टक्के लोकसंख्या ही स्वित्झर्लंडच्या आर्थिक परिस्थितीशी आणि राजकीय वातावरणाशी समाधानी आहेत. तसेच स्वित्झर्लंडला काम करायला गेलेल्या 82 टक्के लोकांनीही त्यांना या देशात राहायला आवडत असल्याचं सांगितलं. तसेच 42 टक्के लोकांनी स्वित्झर्लंडला राहणं हे आरोग्याच्या दृष्टीनेही उत्तम असल्याचं सांगितलं. याशिवाय काम करायला आणि राहण्यासाठी उत्तम असलेल्या देशांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर सिंगापुर हा देश आहे.

Instagram Addicted असाल तर या आजारांना देताय निमंत्रण

घरात चुकूनही आणू नका या गोष्टी, पैसा फिरवेल पाठ

रक्षाबंधन: बहिणीचं टिळा लावणं असतं आरोग्यदायी, वाचा हे 7 फायदे

तुम्हाला गरजेपेक्षा जास्त जांभया येतात तर व्हा सावधान!

VIDEO : निवडणुका पुढे ढकलाव्यात? शरद पवार म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 06:06 PM IST

ताज्या बातम्या