स्विमिंग की सायकलिंग; चरबी घटवण्यासाठी कोणता व्यायाम आहे उत्तम?

स्विमिंग की सायकलिंग; चरबी घटवण्यासाठी कोणता व्यायाम आहे उत्तम?

चरबी कमी करण्यासाठी कोणता व्यायाम चांगला याबाबत अनेकांच्या मनात गोंधळ असतो.

  • Last Updated: Aug 5, 2020 05:33 PM IST
  • Share this:

उत्तम आरोग्यासाठी शरीर संतुलित राहणे आवश्यक आहे. पण अनियमित दिनचर्या आणि अयोग्य आहार यामुळे लोकांच्या शरीरात चरबीचे प्रमाण वाढते आहे. काही लोक याबाबत जागरूक आहेत आणि ते नियमित व्यायाम करतात. मात्र चरबी कमी करण्यासाठी कोणता व्यायाम चांगला याबाबत त्यांच्या मनात गोंधळ असतो. काही लोक वेगाने चालण्याचा व्यायाम करतात तर काही पोहोतात. तर जाणून घेऊया चरबी कमी करण्यासाठी कुठला व्यायाम चांगला आहे -

पोहोणे एक उत्तम व्यायाम

myupchar.com च्या डॉ. मेधावी अग्रवाल म्हणाल्या, सर्वच जण पोहोण्याचा व्यायाम करू शकतात. या व्यायामात सर्वच अवयवांना व्यायाम मिळतो, म्हणूनच अनेकांना तो आवडतो. यात चांगल्या कॅलरी बर्न होतात. हृदयाला सक्षम ठेवण्यासाठी पोहोण्यासारखा चांगला व्यायाम नाही. तो फुफ्फुसे आणि हृदयाच्या नसांना मोकळे करतो. त्याने हृदयाचा झटका, उच्च रक्तदाब यासारखे आजार होत नाहीत. ज्यांना अंगदुखी असेल त्यांनीही पोहोण्याचा व्यायाम करायला हवा, याने हाडे आणि स्नायू बळकट होतात. वजन कमी करण्यासाठी पोहोणे आणि सायकल चालवणे यांची तुलना केली असता पोहोण्याने 750 कॅलरी बर्न होतात, त्याने अस्थमा कमी होतो, औदासिनतेपासून मुक्तता मिळते आणि त्वचेत आर्द्रता राहते.

सायकल चालवणेही कमी फायद्याचे नाही

सायकल चालवणे हा एक कमी त्रासाचा व्यायाम आहे, पण सायकल चालवताना अनेकप्रकारे सावध राहवं लागतं. सायकल चालवणं, पोहोण्यापेक्षा सोपे आहे. सायकलने ऑफिस आणि बाजारात जाऊ शकतो. त्याशिवाय सायकल चालवल्याने शरीरातील कंबरेखालील भागाला चांगला व्यायाम मिळतो. त्याने पायांना सतत चांगला व्यायाम होतो, पायांच्या समस्या दूर होतात. myupchar.com च्या डॉ. मेधावी अग्रवाल म्हणाल्या, जर एखादी व्यक्ती 10 मैल प्रती तास या वेगाने सायकल चालवत असेल तर एका तासात 260 कॅलरी वापरल्या जातात. सायकल चालवण्याने मधुमेह नियंत्रणात राहतो, तणाव कमी होतो, शरीरातील उर्जा वाढते, सांधेदुखी कॅन्सरसारख्या आजारांचा धोका राहत नाही.

अशी करा तुलना

जर शरीरातील जास्तीत जास्त कॅलरी बर्न करायच्या असतील तर पोहोणे उत्तम पण स्नायू बळकट करायचे असतील तर सायकल चालवणे चांगले आहे. जर हृदयाशी संबंधित आजार असतील तर पोहोणे आणि सायकल चालवण्याचा व्यायाम करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हृदयाच्या गतीशी निगडीत हे व्यायाम शरीरात समस्या निर्माण करू शकतात. जर काही शारीरिक व्याधी असतील तर कुठलाही व्यायाम करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा म्हणजे व्यायाम करताना आणि नंतर कुठलीही समस्या होत नाही.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - अशक्तपणा

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: August 5, 2020, 5:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading